शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

'मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा', गावाला जाऊन करु काय? बिहारपेक्षा महाराष्ट्र कधीही सरसच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 19:46 IST

पुने से अभी बडा लगाव बन गया है, इस शहरसे बाहर जाने का मन नही करता...

ठळक मुद्देसुतारकाम करणाऱ्या विजेंद्र चौहान रेल्वे स्थानकावरुन फिरला माघारी दोन पैसे कमवणे कधीही फायदेशीर 

युगंधर ताजणे पुणे : आता गावाला काय परिस्थिती आहे याची कल्पना मित्र फोनवरुन देतात. गावातील लोकांच्या हाताला काम नाही. दिवसभर एखाद्या पारावर बसून असतात. गप्पांमध्ये वेळ वाया घालवतात. येथे महाराष्ट्रात लॉकडाऊन असला तरी कामाला तुटवडा नाही. सुतारकाम, रंगकाम सुरु आहे. चार दोन पैसे गाठीशी येतात. त्यामुळे गावाला जाऊन करणार काय? बिहार आणि युपीपेक्षा महाराष्ट्र सरसच आहे. माणूस उपाशी राहत नाही.त्याला दोन वेळचे अन्न मिळते. या शब्दांत परप्रांतीय विजेंद्र याने आपल्या भावना व्यक्त केल्या.     उत्तर प्रदेशातील आणि गोरखपूर गावात राहणारा विजय सोळा वर्षांचा असताना पुण्यात आला. सध्या तो हडपसर येथे विकास यादव याच्या समवेत राहतो. सुतारकाम, रंगकामाचे काम हे दोघेजण करतात. सध्या मोठ्या संख्येने परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविले जात आहे. कोरोनाचे वाढणारे संकट पाहता विजेंद्रने सुरुवातीला गावी जाण्याचा निर्णय घेतला. फॉर्म भरुन, आरोग्य तपासणी करुन गावी जाण्याची तयारी सुरु केली. ज्यादिवशी गावाला जायचे त्यावेळी रेल्वे स्थानकावर गेला. मात्र अचानक काय डोक्यात आले अन तो पुन्हा माघारी फिरला. गावाला जाऊन करणार काय? हजारोच्या संख्येने सर्वजण गावाला चालले आहे. अशावेळी तिथे देखील राहण्याचा, जेवणाचा आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर काम शोधण्यासाठी संघर्ष करावा लागेल. तेव्हा काम मिळवणे आव्हानात्मक असल्याने सध्या आहे त्याठिकाणी राहणे शहाणपणाचे ठरेल. असा विचार विजेंद्रने केला. त्याने गावी जाण्याचा निर्णय रद्द केला. उत्तरप्रदेश, बिहार, या राज्यांतून आलेले मोठे कामगार हडपसर, मुंढवा, घोरपडी, उंड्री,कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, या भागात आहेत. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे. इमारतीची कामे, रंगकाम, सुतारकाम हे कामगार करतात. यातील 4 हजारांपेक्षा अधिक कामगार आता आपआपल्या गावी परतले आहेत. मात्र अनेक कामगार अजूनही आपल्या गावी जाण्यास तयार नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे याठिकाणी मिळणारा मुबलक पैसा आणि दोन वेळचे जेवण हे असल्याचे विजेंद्र याने सांगितले.    चार मुलांचा बाप असणाऱ्या विजेंद्रला लॉकडाऊनच्या काळात काम करुन पैसा कमवायचा आहे. हे पैसे कमवून पुढे कोरोनामुक्त दिवाळी साजरी करायची आहे. सध्या गावाला पैसे पाठवून फोनवरुन त्यांची खुशाली विचारतो. आता गावाला गेल्यावर पुन्हा त्यांच्याकरिता अडचण होण्यापेक्षा पुण्यातच थांबलेले केव्हाही चांगले. असे त्याचे म्हणणे आहे. जितकी मदत महाराष्ट्रातून केली जात आहे त्या तुलनेने ती बिहार आणि युपीतून होत नसल्याचे तो सांगतो.  आता एका लेबर कँम्पमध्ये राहणाऱ्या विजेंद्रला आसपासच्या सोसायटीतील नागरिक जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करतात. जेवण देतात. सध्या गँसला पैसे नसल्याने तो आणि त्याचा मित्र चुलीवर भात शिजवून खातात. 

 * यहाँ से जाने का मन नही करता....पुने से अभी बडा लगाव बन गया है, इस शहरसे बाहर जाने जा मन नही करता असे म्हणत विकास आपले पुण्याबद्द्लचे प्रेम व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्षांपासून बेकारी, गरिबी आणि बेरोजगारी या प्रश्नांनी ग्रासलेल्या बिहार आणि उत्तरप्रदेशातील परिस्थिती बिकट आहे. आपण तिथे जाऊन आणखी त्यात भर टाकण्यापेक्षा येथे राहून काम करणे अधिक महत्वाचे वाटते. माणूसकीचा आगळावेगळा प्रत्यय येथे पाहायला मिळतो. पुण्यात भरपूर काम आहे. ते सोडून गावी जाण्याचा विचार नसल्याचे विकासने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBiharबिहारLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या