शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या कुटुंबीयांनी स्वावलंबी व्हावे - ब्रिगेडियर रघुनाथ जठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 03:31 IST

‘जवान शहीद झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा, आधार मिळतो. कृतज्ञतेच्या भावनेतून अनेकजण पाठीशी उभे राहतात. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे.

पुणे : ‘जवान शहीद झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा, आधार मिळतो. कृतज्ञतेच्या भावनेतून अनेकजण पाठीशी उभे राहतात. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. स्वाती महाडिक, गौरी महाडिक या तरुणी पती शहीद झाल्यानंतर प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाल्या, ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे’, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) रघुनाथ जठार यांनी केले. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाचे सांत्वन आपण शब्दांत करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील वीरमाता, वीरपत्नी आणि वीरपित्यांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या सीमेवर संरक्षण करताना वीरमरण आलेल्या सैनिकाप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा सोहळा आयोजिला होता. काही दिवसांपूर्वीच शहीद झालेल्या मेजर शशिधरन नायर यांच्या पत्नी तृप्ती नायर, अबोली मोहोरकर, सोनाली सौरभ फराटे, भारत-चीन युद्धापासून आपल्या पतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मालती जगताप यांच्यासह एकूण ५५ वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. विजयकुमार मर्लेचा यांनी आपल्या मातोश्री कांताबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानचिन्हे दिली.अश्वमेध सभागृहात झालेल्या या सोहळ्याला जिल्हा सैनिक बोर्डाचे मेजर (निवृत्त) मिलिंद तुंगार, कॅप्टन (निवृत्त) सुरेश जाधव, अ‍ॅड. इंद्रजितसिंग गिल, वीरपत्नी अबोली मोहोरकर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, कार्यकर्त्या मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते. देशभक्तीपर गीतांची धून, शहीद जवानांविषयीच्या आठवणी यामुळे सभागृह भारावून गेले होते.गौरी कुलकर्णी व मंजिरी तिक्का यांनी शहिदांच्या कुटुंबीयांसाठी गायन सादर केले. श्रीराम ओक यांनी निवेदन केले. मीनाताई कुर्लेकर यांनी आभार मानले.ग्रामीणमधील हुताम्यांच्या कुटुंबीयांसाठी काम...अबोली मोहोरकर म्हणाल्या, ‘सैनिकांविषयीच्या माहितीचा अभाव अजूनही समाजात दिसतो. आर्थिक मदतीची, सहानुभूतीची आम्हाला गरज नसते. परंतु, आपलेपणाच्या भावनेने बोलणारी आणि सोबत राहणारी माणसे हवी असतात. ग्रामीण भागातील शहिदांच्या पत्नी, त्यांची मुले यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. ’कुर्लेकर म्हणाल्या, ‘देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांबरोबर काम करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. यापुढे ज्या शहिदांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही, अशांसाठी संस्था मदत करेल.’

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPuneपुणे