शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकास सक्तमजुरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:07 IST

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सागर ऊर्फ सिद्धेश्वर अभिमान ढोबळे (वय ४३, रा़ अशोक सोसायटी, थेरगाव) असे त्याचे नाव आहे.

पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सागर ऊर्फ सिद्धेश्वर अभिमान ढोबळे (वय ४३, रा़ अशोक सोसायटी, थेरगाव) असे त्याचे नाव आहे़ याबाबतची हकिकत अशी, की पीडित अल्पवयीन मुलगी सागर ढोबळेकडे कराटे प्रशिक्षकासाठी जात होती़ त्याचा येरवडा येथे क्लास होता़ त्याने या मुलीला लीडर बनविले असल्याचे खोटे सांगून तिला कराटेसाठी नवीन कपडे, टी-शर्ट वगैरे घेण्याच्या बहाण्याने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी लैंगिक चाळे, अश्लील कृत्य केले़ आरोपीने तिला खोटी कारणे सांगून मॉलमध्ये पिंपरी येथील एका शाळेमध्ये, डोंगराळ भागात घेऊन गेला होता़ या प्रकाराने घाबरून तिने क्लासला जाणे बंद केले होते़ मात्र, या प्रकाराबाबत तिने ताबडतोब कोणाला सांगितले नव्हते़सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या निर्भया अभियानातंर्गत शाळेत केल्या असताना हा प्रकार समोर आला़ त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात २३ जून २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी पीडित मुलगी, शाळेच्या मुख्याध्यापिकांसह चार साक्षीदार नोंदविले़निर्भया अभियानामुळे गुन्हा उघडकीसदिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला पोलीस अधिकारी शाळा, महाविद्यालयात जाऊन मुलींशी संवाद साधतात़ या अभियानांतर्गत मुलींना सक्षम बनविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या येरवडा येथील शाळेत गेल्या होत्या़ त्यावेळी त्यांचे बोलणे ऐकूण पीडित मुलीने त्यांना व मुख्याध्यापिका यांना हा प्रकार सांगितला़ त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना शाळेत बोलवून घेतले़ तेथे या मुलीने आईवडिलांसमक्ष संपूर्ण माहिती दिली़ त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ निर्भया अभियानामुळे हा प्रकार उघडकीस आला होता़

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणे