शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांची निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय दिव्यांग पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पीडित युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी मतिमंद असून तिचे पालक पुण्यामध्ये राहतात. तिच्या पालकांनी तिला पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षणासाठी दाखल केले आहे. पीडित मुलगी आजारी असल्याने तिच्या पालकांनी तिला घरी आणले होते. परंतु तिला बरे वाटत असल्याने पुन्हा २१ डिसेंबर रोजी पाबळ येथे आणून सोडले होते. त्यांनतर २२ तारखेला तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला शिक्षकांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती गरोदर असल्याचे सांगितले. तिच्या पालकांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनतर तिच्या पालकांनी तातडीने पाबळ येथे येत मुलीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली.पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करत आहेत.
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्रापूर येथील संतापजनक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 14:55 IST
पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांची निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून तिच्यावर बलात्कार झाला आहे.
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्रापूर येथील संतापजनक प्रकार
ठळक मुद्देती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडभा. दं. वि. कलम ३७६ तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल