सांडवा दुरूस्तीमुळे मिळणार तीन महिने अधिक पाणी : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:02 AM2021-08-02T04:02:58+5:302021-08-02T04:02:58+5:30

पळसदेव न्हावी व रुईसाठी शेतीसाठी वरदान ठरलेल्या पळसदेव तलाव या तलावाचा सांडवा १४ ऑक्टोबर २०२० रोजी ...

Sewage repair will get three more months of water: Black | सांडवा दुरूस्तीमुळे मिळणार तीन महिने अधिक पाणी : काळे

सांडवा दुरूस्तीमुळे मिळणार तीन महिने अधिक पाणी : काळे

Next

पळसदेव न्हावी व रुईसाठी शेतीसाठी वरदान ठरलेल्या पळसदेव तलाव या तलावाचा सांडवा १४ ऑक्टोबर २०२० रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पावसामध्ये पाण्याने वाहून गेला होता यावेळी शेतकऱ्यांनी उजनी जलाशयातून केलेल्या पाईपलाईन पाण्यात वाहून गेले होते शेतकऱ्यांचे झालेले पाईपलाइनचे नुकसान व शेती पिकाचे नुकसान झाले होते गेल्यावर्षी तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही सांडवा वाहून गेल्यामुळे पाच महिन्यांचा पाणीसाठा संपून गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाला पाणी देण्यासाठी मोठे हाल झाले होते. पळसदेव, न्हावी, रुई येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता या तलावाचा सांडवा दुरुस्त करण्यासाठी २२ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर केला होता. कृषी अधिकारी राजेंद्र काळे ,उपसरपंच पुष्पलता राजेंद्र काळे माजी सरपंच अनिल खोत, रुई गावचे सरपंच यशवंत कचरे, उपसरपंच मगन मराडे, न्हावी गावचे सरपंच बळीराम बोराटे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत बनसुडे, संपत काळे सतीश येडे, कैलास भोसले उपस्थित होते.

पळसदेव येथे सांडवा दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करताना पुष्पलता काळे व इतर.

०१०८२०२१-बारामती-०२

Web Title: Sewage repair will get three more months of water: Black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.