शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सत्तरीतील तरुणाची १७९७ वेळा सिंहगडवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:24 IST

पुणे : फेब्रुवारी १९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सिंहगडाकडे कूच केली. उत्तम आरोग्य राखण्याचा संदेश देत त्यांनी आता १७९७ चा टप्पा पूर्ण केला आहे.

ठळक मुद्देदर गुरुवारी सिंहगड वारी करणारा हा ६९ वर्षांचा अवलिया पूर्वी अवघ्या ५० मिनिटांत ५ वेळा पर्वती चढण्या - उतरण्याचा व्यायाम करत होता. ४सिंहगड ट्रेक करण्यासोबतच खाटपे यांनी गोवा, मिझोरम, उटी,  हिमालय, राजस्थान यांसारख्या अनेक ठिकाणी ट्रेक केले प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ते तरुणांना आरोग्य संवर्धनासाठी प्रोत्साहीत करतात.     

पुणे : बागेत फिरायला जाणारे, ताणतणाव दूर करण्यासाठी हास्ययोग करणारे आणि चालण्याचा दैनंदिन व्यायाम करणारे अनेक ज्येष्ठ पुण्यात आहेत. मात्र, पर्वतीवर फिरायला जाण्यासोबतच ३० वर्षांत १७९७ वेळा ट्रेक सिंहगड सर करण्याचा संकल्प एका सत्तरीतील तरुणाने पूर्ण केला आहे. अवघ्या १ तास ४५ मिनिटांमध्ये सिंहगड चा १७९७ वा टप्पा पूर्ण करण्याचे धाडस या जिगरबाज तरुणाने केले आहे.  सदाशिव पेठेत विजयानगर कॉलनी येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक युवराज खाटपे यांचा सकाळी फिरायला जाणे, हा आवडता छंद. फेब्रुवारी १९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सिंहगडाकडे कूच केली आणि उत्तम आरोग्य राखण्याचा संदेश देत त्यांनी आता १७९७ चा टप्पा पूर्ण केला आहे. त्याबद्दल त्यांचे मित्र पी. एम. जोशी, डॉ. संतोष कोठारी, जितेंद्र लडकत, गजाभाऊ कदम, मिशेल काकडे, सुनील बोडस, दिनेश महाजन यांनी खाटपे यांचा पुणेरी पगडी, उपरणे देऊन सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दर गुरुवारी सिंहगड वारी करणारा हा ६९ वर्षांचा अवलिया पूर्वी अवघ्या ५० मिनिटांत ५ वेळा पर्वती चढण्या - उतरण्याचा व्यायाम करत होता. इतिहासाची पहिल्यापासून खाटपेंना आवड. त्यामुळे पुण्याजवळ असलेल्या सिंहगडाविषयी नेहमीच उत्सुकता. त्यामुळे पर्वतीनंतर हळूहळू सिंहगडावर जाण्यास त्यांनी सुरुवात केली. तेथेही पर्वतीप्रमाणे मित्रमंडळी जमले आणि त्यांची सिंहगडाची दर गुरुवार-रविवारची नित्याची वारी सुरू झाली. मोठ्या बांधवांनी प्रोत्साहन दिले. सिंहगडाला जाण्यात खंड पडू नये, यासाठी मोबंधू सुभाष खाटपे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे जितेंद्र लडकत , डॉ. संतोष कोठारी, विनय कुलकर्णी, पी.एम.जोशी, वसंत सुरुडकर, आणि सिंहगड वारकरी संघ असा मित्रमंडळींचा कट्टा सिंहगडावर जाण्यासाठी दर गुरुवार व रविवारी जमत होता. पहाटे ४ वाजता पुण्यातून निघायचे. सकाळी ५ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचत सिंहगडावर चढण्यास सुरुवात करत असत.  ४सिंहगड ट्रेक  करण्यासोबतच खाटपे यांनी गोवा, मिझोरम, उटी,  हिमालय, राजस्थान यांसारख्या अनेक ठिकाणी ट्रेक केले आहेत. तर कात्रज ते सिंहगड ट्रेक त्यांनी तब्बल ६ वेळा पूर्ण केला आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ते तरुणांना आरोग्य संवर्धनासाठी प्रोत्साहीत करतात.     

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्ला