शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विक्रीसाठी आणलेला ७० किलो गांजा जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 19:16 IST

गांजा विक्रीचा व्यापार करणा-यांवर कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गेल्या महिन्यापासून शहराला जोडणा-या रस्त्यांवर गस्त सुरू आहे.

ठळक मुद्देएकूण १० लाख ५५ हजार ७१५ रुपये किंमतीचा ७० किलो गांजा

पुणे : शहरात विक्रीसाठी आणलेला ७० किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथक व हडपसर पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.  विष्णू किसन जाधव ( वय ३४, माळशिरस), अखिला बिपीन नायक (वय २२), सुब्रत सिताकांता नायक (वय २०), पिटर देवराज नायक ( वय २७, सर्व रा, आडावा, ता. मोहाना, जि. गडपती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा गांजा त्यांनी ओरिसामधून पुण्यात आणला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजा विक्रीचा व्यापार करणा-यांवर कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गेल्या महिन्यापासून शहराला जोडणा-या रस्त्यांवर गस्त सुरू आहे. गुरुवारी पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय पोलीस फौजदार शिंदे कर्मचारी व हडपसर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रासमोर काळ्या रंगाची कार संशयास्पद रित्या उभी असलेली आढळली. पोलिसांना कारमधील चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी चौकशी केली आणि कारची झडती घेतली. त्यावेळी कारमधून ४ बँग व १ नायलॉन पिशवीमध्ये एकूण १० लाख ५५ हजार ७१५ रुपये किंमतीचा ७० किलो गांजा मिळून सापडला. पोलिसांनी तो कारसह गांजा जप्त केला आहे. या चौघांवर हडपसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओरिसातील तिघांनी हा गांजा विष्णू किसन जाधव याच्या सांगण्यावरून आणला असल्याचे त्यांनी सांगितले. तर विष्णू जाधव याच्यावर २०१५ मध्ये गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. के. आदलिंग करत आहेत. 

टॅग्स :HadapsarहडपसरPoliceपोलिसArrestअटकCrimeगुन्हा