पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दाखल झालेले सात जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. माघारीची मुदत ९ सप्टेंबरपर्यंत असून, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.अध्यक्षपदासाठी महामंडळाकडे अर्ज दाखल करण्याची गुरुवारी दुपारपर्यंत मुदत होती. यात शरणकुमार लिंबाळे, अरुण जाखडे, श्रीनिवास वारुंजीकर, डॉ. रवींद्र शोभणे, प्रा. चंद्रकुमार नलगे, विठ्ठल वाघ, डॉ. श्रीपाल सबनीस यांचे अर्ज महामंडळाने निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांच्याकडे सुपूर्द केले. अर्जांची छाननी झाल्यानंतर सर्व अर्ज वैध असल्याचे जाहीर करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी वारुंजीकर यांनी अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)
सातही अर्ज वैध
By admin | Updated: September 4, 2015 02:17 IST