शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला सतरा लाखाचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 15:40 IST

संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत जप्त केला.

ठळक मुद्देटेम्पोसह २५ लाखाचा ऐवज जप्त, दोघेजण ताब्यात चाकण पोलीस अन्न व औषध प्रशासनान यांच्या संयुक्तपणे झालेल्या कारवाई

चाकण : संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पकडला असून यात १७ लाख ३१ हजार ८४० रुपये किंमतीचा ४१ पोती गुटखा पकडला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व अन्न भेसळ सुरक्षा रक्षक महेंद्र पाटील यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचा चालक व क्लिनर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आयशर टेम्पोसह २५ लाख ३१ हजार ८४० किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. छुप्या पद्धतीने गुटखा विक्री जिल्ह्यात होत असल्याची माहिती प्रशासनाला गुप्त खबऱ्याकडून मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१३जुलै ) पहाटे मुंबई येथून एक आयशर कंपनीच्या टेम्पो शिक्रापूर येथे गुटखा घेऊन जाणार असल्याचे रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पथकाला मिळाली. त्यानुसार येथील तळेगाव चौकात गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी शिताफीने पकडला. या टेम्पोतुन वाहतूक करण्यात आलेला १७ लाख ३१ हजार ८४० रुपयांचा गुटखा व ८ लाख रुपयांचे वाहने असा सुमारे २५ लाख ३१ हजार ८४० रुपयांचा ऐवज चाकण पोलीस अन्न व औषध प्रशासनान यांच्या संयुक्तपणे झालेल्या कारवाईत जप्त केला. टेम्पो वाहन क्रमांक ( एम. एच. ०४ एच. डी. ५८९० ) या वाहनासह टेम्पो चालक बिपीन वैचन गिरी व क्लिनर मुकेश काशी गिरी यांना ताब्यात घेतले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेखर कुलकर्णी, अजय भापकर, संजय सूळ, नवनाथ खेडकर, होमगार्ड वैजनाथ पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 

टॅग्स :ChakanचाकणCrimeगुन्हाPoliceपोलिस