शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-याला सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 21:13 IST

ताडीवाला रस्ता परिसरात दहशत माजविणा-याला अटकाव करण्याचा प्रयत्न करणा-या पोलिसावरच कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-यास सात वर्षे सक्तमजुरीची आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

पुणे : ताडीवाला रस्ता परिसरात दहशत माजविणा-याला अटकाव करण्याचा प्रयत्न करणा-या पोलिसावरच कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-यास सात वर्षे सक्तमजुरीची आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के.कदम यांनी हा आदेश दिला आहे. विलास अनिल गायकवाड (वय २८, रा. ताडीवाला रस्ता) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुहास पांडुरंग बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १५ नोव्हेंबर २००९ रोजी दुपारी अडीच ते २ वाजून ५५ मिनिटांनी घडली होती. सरकारी पक्षातर्फे देशमुख यांनी १० साक्षीदार तपासले. यात फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. कर्तव्य बजावणाºया पोलिसांवर होणारे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे अशा हल्लेखोरांना कडक शिक्षा झाल्यास समाजात योग्य तो संदेश जाईल, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केला होता. तो ग्राह्य धरत न्यायाधीशांनी आरोपीस ७ वर्षांची शिक्षा सुनावली. एस. एम. नाडगौडा यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल हुंडेकरी यांनी मदत केली. फिर्यादी ताडीवाला रस्ता पोलीस चौकीसमोर होते. त्यावेळी घरासमोरील पाण्याचे ड्रम कोयत्याने फोडून आणि नागरिकांना कोयता दाखवून एक व्यक्ती दहशत माजवत असल्याची माहिती एका महिलेने फिर्यादींना दिली होती. त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेत, गायकवाड याला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने फिर्यादीवरच कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तो फिर्यादींनी चुकविला. त्यानंतर दुसरा वार डोक्यावर करीत असताना, तो अडविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटला होता.

टॅग्स :Courtन्यायालय