शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सात व्हायोलिनवादकांची गजाननबुवा जोशींना स्वरांजली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:17 IST

स्वरबहार या संस्थेच्या वतीने गायन वादनाचार्य पं.गजाननबुवा जोशी यांच्या १०७ व्या स्मृतीप्रित्यर्थ ही दोन दिवसांची बहारदार मैफल रंगली.

ठळक मुद्देपं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य पं. भालचंद्र देव (वय ८३) यांनी बहारदार वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

पुणे:  पुण्यातल्या सात व्हायोलिनवादकांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून पं. गजाननबुवा जोशी यांना स्वरांजली अर्पण केली. स्वरबहार या संस्थेच्या वतीने गायन वादनाचार्य पं.गजाननबुवा जोशी यांच्या १०७ व्या स्मृतीप्रित्यर्थ ही दोन दिवसांची बहारदार मैफल रंगली. गजाननबुवांचे शिष्य पं. भालचंद्र देव आणि त्यांच्या कन्या चारूशीला गोसावी यांनी सांस्कृतिक पुणेच्या सहकार्याने गांधर्व महाविद्यालयाच्या सभागृहात या मैफलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वैष्णवी काळे, रजत नंदनवाडकर, डॉ. निलिमा राडकर, वसंत देव, देवेंद्र जोशी, अभय आगाशे यांनी आपले स्वतंत्र शास्त्रीय वादन केले. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या समारोपामध्ये गोसावी यांनी राग गावती आणि त्यांनीच तयार केलेली किरवाणी धून सादर करून आपल्या उत्तम व्हायोलिनवादनाची साक्ष दिली. पं.गजाननबुवांच्या काही रचनांचे एकत्रितपणे व्हायोलिनवर वादन करून अभय आगाशे, रजत नंदनवाडकर, वसंत देव, देवेंद्र जोशी, यांनी रसिकांना त्यांची शैली कशी होती ते विविध गीतातून ऐकविले.कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी पं. गजाननबुवांच्या काही आठवणी आणि त्यांच्या जुन्या कार्यक्रमातील आणि मुलाखतीतील भाग यावर आधारित चित्रफित मुद्दाम तयार करून ती रसिकांसमोर दाखविण्यात आली. त्यासाठी सुभाष इनामदार यांचा सहभाग मोलाचा होता. नवीन व्हायोलिन वादकांमध्ये पं.भालचंद्र देव यांच्याकडे शिकत असलेला रजत नंदनवाडकर यांच्या वादनामध्ये चमक आहे. वाजविण्याची पध्दतही अधिक आकर्षक आहे. आणि वादनातले बारकावे त्याने सहजपणे साध्य केल्याचे दिसले. आगाशे यांनी सादर केलेला राग रागेश्री आणि राडकर यांचा मारुबिहाग अधिक पसंतीस उतरला. शेवटी पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य पं. भालचंद्र देव (वय ८३) यांनी आपले बहारदार वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.  त्यांनी राग पूरिया आणि काही नाट्यपदे आपल्या वादनातून एकविली. आजही त्यांचा स्थिर हात रसिकांना मोहवून गेला. दोन्ही दिवशी रविराज गोसावी आणि मोहन पारसनिस यांनी तबल्याची साथसंगत केली. निवेदनाची धुरा राजय गोसावी यांनी सांभाळली.

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीत