शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आंबिल ओढा करण्यासाठी लागणार तब्बल साडे सातशे कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 07:00 IST

आंबिल ओढ्याची रुंदी २० मीटरवरुन साडे चार मीटरपर्यंत झाली कमी..

ठळक मुद्देशहरातील २५ सप्टेंबरच्या पूरस्थितीनंतर प्रशासनाचा अहवाल तयारअहवाल सादर, गरजेनुसार तातडीने कामे हाती घेणार

पुणे :  गेल्या काही वर्षांत आंबिल ओढ्यावर उगमापासून थेट संगमापर्यंत विविध प्रकाराची अतिक्रमणे झाली आहेत. यामध्ये इमारती, मोठ्या प्रमाणात व्यावासायिक बांधकामे, नाला ग्रार्डन, सिमा भित्त आदी विविध स्वरुपांची अतिक्रमणे करण्यात आली आहेत. या अतिक्रमणामुळे आंबिल ओढ्याची रुंदी २० वरून थेट चार, साडे चार मीटर तर काही भागात ५, ६, ७ मीटरपर्यंत कमी झाली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाली आहे. आंबिल ओढ्यावर झालेले अतिक्रण, ओढ्याची सद्स्थिती, तातडीने करावी लागणारी कामे अदी संदर्भातील अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. यामध्ये आंबिल ओढा पूवर्वंत करण्यासाठी तब्बल साडे सातशे कोटी रुपयांची मागणी देखील प्रशासनाने स्थायी समितीकडे केली आहे.     शहरामध्ये २५ संप्टेंबर रोजी रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे आंबिल ओढ्याला महापूर येऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.  यामुळे दक्षिण पुण्यातील हजारो सोसायट्यामध्ये पाणी शिरले, शेकडो घरे उद्धवस्त झाली, अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर हजारे-शेकडो चार चाकी व दुचाकी वाहने पाण्यासोबत वाहून गेली. यामुळे संपूर्ण शहरामध्ये हाहाकार माजला होता. त्यानंतर शहरातील ओढ्या-नाल्यावर झालेल्या अतिक्रमाणांची जोरदार चर्चा सुरु झाली. याबाबत प्रशसनाने देखील तातडीने आंबिल ओढ्याचा उंगम ते संगमपर्यंत सुमारे १० किलो मिटर चा सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे झाल्यानंतर ओढ्यावर झालेले अतिक्रण, तातडीने कराव्या लागणा-या उपया-योजना, सिमा भितींची कामे, कलवड बांधणे आदीबाबत सविस्तर अहवाल करुन स्थायी समितीला सादर केला आहे.     यामध्ये आंबिल ओढ्याच्या एकूण १० किलो मिटप पैकी साडे पाच किलो मिटरची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. यामध्ये भविष्यात मोठी जिवितहानी टाळण्यासाठी आंबिल ओढ्यावर तातडीने १९०० शे मिटर तर जांदडेर पूल येथे सुमारे ९०० मिटरमध्ये सिमा भित्त उभारण्याची गरज आहे. या सिमा भिंत न बांधल्यास शहाराच्या विविध ४० ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना होऊ शकतात, असा स्पष्ट अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. यासाठी सुमारे ७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  दरम्यान आंबिल ओढ्यावर अनेक ठिकाणी झोपडपट्या, व्यावासायिक बांधकामे, इमारती, बैठी घरे, नाला ग्रार्डन,सिमा भिंती आदी स्वरुपाचीआदी स्वरुपांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे ओढ्याची रुंदी २० मिटर वरुन थेट सात, साडे सात, सहा, पाच आणि काही ठिकाणी तर तब्बल साडे चार मिटर पर्यंत कमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे आंबिल ओढा पूर्ववंत करण्यासाठी तब्बल साडे सातशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.-------------------------अहवाल सादर, गरजेनुसार तातडीने कामे हाती घेणारआंबिल ओढ्याला आलेल्या महापूरानंतर प्रशासनाच्या वतीने या ओढ्यावर झालेली अतिक्रमणे, पडलेल्या सिमा भिंती, कलवड आदीचा सर्व्हे करुन वस्तूस्थिती अहवाल सादर केला आहे. प्रशासनाने आंबिल ओढा पूर्ववंत करण्यासाठी तब्बल साडे सातशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु यामध्ये गरजेनुसार तातडीने करणे आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात येणार आहे.- सुनिल कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष व आमदार

टॅग्स :PuneपुणेfloodपूरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका