शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सात दिवसांचा लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 20:04 IST

पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा काही भाग 13 जुलैपासून लॉकडाऊन करण्यात आला असताना लोणावळा शहर मात्र सुरू होते.

ठळक मुद्देलोणावळा शहरात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या 28

लोणावळा : शुक्रवार व शनिवार दोन्ही दिवस लोणावळ्यात कोरोनाचे पाच पाच रुग्ण मिळून आल्याने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने लोणावळा शहर सोमवारी मध्यरात्रीपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा काही भाग 13 जुलै पासून लॉकडाऊन करण्यात आला असताना लोणावळा शहर मात्र सुरू होते. मात्र याच काळात लोणावळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली.कोरोनामुक्त लोणावळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तो वेगाने वाढत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी सदरचा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. लोणावळा शहरात शुक्रवारी पाच व शनिवारी प‍ाच कोरोना रुग्ण मिळून आले असून 13 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. लोणावळा शहरात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या 28 झाली असून पाच जणांच्या नोंदी नवी मुंबई येथे झाल्या आहेत.

लोणावळ्यात कोरोना नसल्याने येथील बाजारपेठ नियमित सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान सुरू होती. मात्र बाजारपेठेत नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करत नसल्याचे समोर आल्यानंतर येथे 14 भरारी पथके नेमत कारवाई मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यातच चेहर्‍यावर मास्क न लावणार्‍या शेकडो जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. असे असताना बाजारातील गर्दी कमी होत नसल्याने व कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाने लोणावळा सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिले चार दिवस कडकडीत बंद असेल या काळात फक्त मेडिकल व दवाखाने सुरु राहतील. दुध केंद्र सकाळी दोन तास खुली राहतील. चार दिवसानंतर किराणा व भाजीपाला दुकानांना दोन ते तिन तास उघडण्याची मुबा दिली जाईल असे मुख्याधिकारी रवी पवार यांनी सांगितले. दोन दिवसात नागरिकांनी बाजारात गर्दी न करता सात दिवस पुरेल ऐवढेच साहित्य खरेदी करावे अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 दोन दिवसात दहा रुग्ण 

लोणावळ्यात शुक्रवारी भांगरवाडीत 2, पांगोळीत 2 व खंडाळ्यात 1 कोरोना रुग्ण मिळून आला तर शनिवारी भांगरवाडी येथे 1 वलवण गावात 1 व खंडाळ्यात 3 रुग्ण मिळून आले आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाcorona virusकोरोना वायरस बातम्या