शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आठपैकी सात बंधारे कोरडे; १३ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: February 24, 2016 03:28 IST

इंदापूर तालुक्यातील ११ गावे व २३ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ५ गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तर १५ प्रस्ताव पंचायत समितीच्या कार्यालयात

इंदापूर तालुक्यातील ११ गावे व २३ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ५ गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तर १५ प्रस्ताव पंचायत समितीच्या कार्यालयात प्रलंबित आहेत. ३ गावांकडून चारा छावणीची मागणी आली आहे.तालुक्यातील कळंब, वडापुरी, शिरसटवाडी, गलांडवाडी क्र. १ (विठ्ठलवाडी), गोखळी, खोरोची, वकीलवस्ती, कौठळी, शेटफळगढे, रुई, कळस या ११ गावांना व ५७ चाळ, लालपुरी, लक्ष्मीनगर, वेताळनगर, साठेनगर, पवारवस्ती, शिंदेवस्ती, रामवाडी, पिंगळेवाडी, पांढरेवस्ती, माळशिकारेवस्ती, घोगरेवस्ती, सोपानवस्ती, खामगळवस्ती, मगरवस्ती, चोरमलेवस्ती, मारकडवस्ती, कौठी, आमराईमळा, काळेवागळेवस्ती, शिंदेवस्ती, थोरातवस्ती, मराडेवस्ती, गोसावीवस्ती, बिरंगुडी, पिलेवाडी या २३ वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दगडवाडी, अकोले (वायसेवस्ती), घोरपडेवस्ती, व्याहळी, भोडणी या गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत.निमसाखर, कडबनवाडी, चाकाटी, बावडा (कचरवाडी), बावडा, बिजवडी, निमगाव केतकी, पिटकेश्वर, न्हावी, काझड, सराफवाडी, सुरवड, निमगाव केतकी (कचरवाडी) तरंगवाडी, झगडेवाडी येथील प्रस्ताव पंचायत समितीमध्ये प्रलंबित आहेत. तालुक्यात १ लाख ४० हजार ६१७ पाळीव जनावरे आहेत. त्यांमध्ये १ लाख १६ हजार मोठी व २३ हजार ९०७ लहान जनावरे आहेत. तालुक्यात १ लाख १४ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा चारा मार्चअखेर पुरेल, असे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. यामधील १ हजार ९३० मेट्रिक टन चारा दररोज लागणार आहे. तालुक्यातील २२ गावे अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतात. एप्रिल महिन्यात म्हसोबाचीवाडी, लाकडी, निमगाव केतकी; तर मे महिन्यात बिजवडी, शहजीनगर, कळस, निमसाखर भागात चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, अशी स्थिती आहे. दरम्यान, म्हसोबाचीवाडी, कळंब अकोले येथील शेतकऱ्यांनी चाऱ्याची मागणी केली आहे. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या भागातील १,२०० हेक्टर क्षेत्रावर चारापिकांसाठी बियाण्यांचा पुरवठा करण्याच्या सूचना तालुका कृषी कार्यालयाला करण्यात आल्या आहेत. ४ फेब्रुवारी रोजी खडकवासला कालव्याच्या आर्वतनाने तालुक्यातील तलाव भरण्यात आले. तालुक्यातील ८ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांपैकी केवळ जांब येथील बंधाऱ्यातच ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर, उरलेले बंधारे कोरडे आहेत.