शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Adar Poonawalla Coronavirus Vaccination : "ज्यांना प्रवास...;" कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत अदर पूनावाला यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 23:12 IST

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

Adar Poonawalla Coronavirus Vaccination : सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर दुसरीकडे कमी होणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता कोविडचे सर्व निर्बंधही हटवले आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. "देशानं योग्य लस निवडली म्हणूनच यावेळी देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे," असं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

देशात जर कोरोनाची चौथी लाट आली तर ती कमी घातक असेल अशी अपेक्षा असल्याचं पूनावाला म्हणाले. "बूस्टर डोसबद्दल आम्ही सरकारकडे आवाहन केलं आहे. कारण ज्यांना प्रवास करणं आवश्यक आहे त्यांना बूस्टर डोसची गरज आहे. आपण सरकार सोबत चर्चा करत असून लवकरच बूस्टर डोसवर एक धोरण घोषित केलं जाऊ शकतं," असंही ते म्हणाले.बूस्टर डोसची वेळ आलीयेसर्वच देश ते करत आहेत आणि आता भारतासाठी याकडे (बूस्टर डोस) पाहण्याची वेळ आली आहे. केंद्रानं बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना लसीचे डोस देऊन उत्तम काम केलं आहे. आपल्या लसी अन्य देशांच्या तुलनेत चांगल्या सिद्ध झाल्या. अमेरिका आणि युरोपकडे पाहा, त्या ठिकाणी अधिक रुग्ण आहेत. आपण योग्य लसी निवडल्यामुळेच आपल्याकडे रुग्णसंख्या कमी असल्याचं पूनावाला म्हणाले.

यावेळी त्यांना ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटवर प्रभावी ठरेल का असा प्रश्न विचारण्यात आला. "त्या तेव्हाच काम करतील जेव्हा बूस्टर डोस घेतला जाईल. यामुळे भविष्यात येणाऱ्या व्हेरिअंटपासूनही सुरक्षा मिळेल. तज्ज्ञांची टीम सध्या दोन लसींच्या मिश्रणाच्या मुद्द्यावर विचार करत आहे. जगभरात त्याला मान्यता आहे," असं यावर इत्त देताना त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या