शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘सीरम’मध्ये दरमहा ६ कोटी डोस निर्मितीची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 06:38 IST

कोरोनाशी लढाई, भारतासह अनेक देशांमध्ये  ३०० हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहेत

ठळक मुद्देभारतासह अनेक देशांमध्ये  ३०० हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहेत

पुणे : जगात लसीच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड लसीचे ८ ते १० कोटी डोस जानेवारीअखेरपर्यंत ‘सीरम’कडून तयार केले जाऊ शकतात. त्यानंतर दरमहा ५ ते ६ कोटी डोस तयार करण्याची संस्थेची क्षमता आहे.  सध्या भारतात याच लसीची चाचणी अंतिम टप्प्यात असल्याने केंद्र सरकारचे लक्षही त्याकडे लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मह्त्त्वपूर्ण मानली जाते.

भारतासह अनेक देशांमध्ये  ३०० हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यापैकी जवळपास ५० ते ६० लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्यातही १० ते १२ लसीच आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. तर कोविशिल्डसह अमेरिकेतील मॉडर्ना, फायझर आणि रशियातील स्पुटनिक या लसींच्या चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा कंपन्यांनी केला  आहे. यात चीननेही आघाडी घेतलेली आहे.  ‘सीरम’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी एका कार्यक्रमात बोलताना संस्थेकडून जानेवारीपर्यंत लसीचे ८ ते १० कोटी डोस तयार असतील, असे सांगितले होते. तसेच त्यानंतर प्रत्येक महिन्याला ५ ते ६  कोटी डोस तयार करण्याची  क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधानही भेट देणारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा प्राथमिक कार्यक्रम आला असल्याने त्यांचे पुण्यात येणे निश्चित आहे. मात्र ते कधी येणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसल्याचे नाटेकर यांनी सांगितले.

शंभर देशांचे राजदूत ४ डिसेंबरला ‘सीरम’मध्ये पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युल्स’ कंपनीला शंभर देशांचे राजदूत ४ डिसेंबरला भेट देणार आहेत. सर्व राजदूत दोन गटांमध्ये दोन्ही ठिकाणी भेट देणार असल्याची अधिकृत माहिती जिल्ह्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

एअरफोर्सचे विमान केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या दौऱ्यानुसार ४ डिसेंबरला दिल्लीतून एअर फोर्सच्या विमानाने ९८ देशांचे राजदूत लोहगाव विमानतळावर ४ डिसेंबरला सकाळी सव्वादहा वाजता दाखल होतील.

संस्थेकडून जानेवारीपर्यंत लसीचे 

८-१० कोटी डोस तयार असतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे