शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

...हा तर जिझीया कर, पार्किंग धोरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:50 AM

महानगरपालिकेने पार्किंग धोरणाचा विषय सादर केल्यानंतर शहरात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येक नागरिकाशी निगडीत हा प्रश्न असल्याने या कराची तुलना जिझीया कराशी करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसपासून ते खासगी दुचाकी-चारचाकी वाहनेदेखील त्याच्या कचाट्यात येणार आहे.

पुणे : महानगरपालिकेने पार्किंग धोरणाचा विषय सादर केल्यानंतर शहरात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येक नागरिकाशी निगडीत हा प्रश्न असल्याने या कराची तुलना जिझीया कराशी करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसपासून ते खासगी दुचाकी-चारचाकी वाहनेदेखील त्याच्या कचाट्यात येणार आहे. या प्रश्नावर चर्चेचा आणि मतमतांतराचा कल्लोळ आत्ताच सुरू झाल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले.महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पार्किंग धोरणाचा विषय महापालिकेच्या स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवला होता. त्यात त्यांनी रस्त्यावरील पार्किंगच्या शुल्काबाबतही भाष्य केले आहे. त्यावरच न थांबता रात्री निवासी वसाहतीतील महापालिकेच्या रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या वाहनांचादेखील त्यात विचार केला आहे. त्यांनादेखील शुल्काच्या कक्षेत आणले आहे. शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३१ लाख १५ हजार इतकी आहे. शहर आणि परिसरात २०१७ पर्यंत ३५ लाख ५० हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. सरासरी दररोज ५०० ते ७०० नवीन वाहनांची भर पडत आहे.मध्यवर्ती पेठांतील वाडे आणि उपनगरांमधील बांधकामांची रचना पाहिल्यास खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ बहुतांश ठिकाणी नाही. झोपडवस्तीतील वाहनेदेखील रस्त्यांवरच लागतात. अनेक सोसायट्यांमधे वाहनतळ असले तरी ते सदनिकांच्या मानाने पुरेसे नाही. घरटी तीन ते चार दुचाकी असणाºयांचे प्रमाणदेखील शहरात मोठे आहे. शिवाय चारचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहने यांचीदेखील मोठी संख्या आहे.रात्री शहराचा फेरफटका मारला तरी पीएमपीच्या बसपासून चारचाकी, दुचाकी, तीनचाकी आणि खासगी प्रवासी वाहनांची रस्त्यांवर गर्दी दिसते. रस्ते हेच हक्काचे वाहनतळ झालेले आहे. कात्रज, धनकवडी, आंबेगाव, वडगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसर, हडपसर, येरवडा, कोथरूड आणि औंधचा काही भाग, मध्यवर्ती पेठा असे सर्वच भाग या पार्किंग कल्लोळात येतात.महापालिकेने निवासी पार्किंगसाठी रात्री १० ते सकाळी ८ या १० तासांसाठी वाहन प्रकारानुसार ४ हजार ५६२ ते १८ हजार २५० रुपये असा वार्षिक पासचा दर प्रस्तावित केला आहे. घरटी दोन ते चार वाहने असण्याचे प्रमाण जास्त असल्याने प्रत्येक कुटुंबावर त्या प्रमाणात वार्षिक ९ ते १८ हजार रुपयांचा पार्किंग शुल्काचा भार पडणार आहे. त्यामुळे लोकभावना या पार्किंग शुल्काच्या विरोधातच असल्याचे दिसून येत आहे.घरपट्टीत रस्त्याचा कर आहे, प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहन क्रमांक देताना वाहतूक कर घेते; मग हा नवा कर घेण्याचे काय कारण आहे. नवीन पार्किंग धोरणाच्या माध्यमातून पुणेकरांवर जिझीया कर लादला जात आहे. या धोरणाचा निषेध करतो. हा ठराव तातडीने रद्द केला पाहिजे.उत्तम भूमकर, अध्यक्ष, पुणे शहरकाँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघपेठांमधील रहिवाशांना पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. येथील रहिवाशांनी भुर्दंड का सहन करायचा? महापालिकेने वाहनसंख्या कमी करण्यासाठी शुल्क आकारण्याऐवजी इतर मार्गांचा विचार करायला हवा. वाहनसंख्या कमी करण्यासाठी नवीन वाहनांच्या विक्रीवर निर्बंध आणायला हवेत. तसेच पेठांमध्ये राहणाºया नागरिकांसाठी वाहनतळाची सोय करावी, तेथे वाहन लावण्यास जरूर शुल्क घ्यावे. मात्र रस्त्यावर लावण्यात येणाºया वाहनांकडून शुल्क आकारू नये. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावरही भर द्यायला हवा- वैजयंती महाशब्दे, नवी पेठपेठांमधील रस्त्यावर लावण्यात येणाºया वाहनांचे शुल्क आकरण्याच्या योजनेजी अंमलबजावणी करणे शक्य नाही. त्याची अंमलबजावणी कशी करण्यात येणार आहे, हे महापालिकेने स्पष्ट करावे. एखाद्याने वर्षभराचे शुल्क भरले आणि त्याजागी दुसºया एखाद्याने वाहन लावल्यास, आधीच्या व्यक्तीने कोठे वाहन लावयचे ? तसेच वाहन लावणारा हा जर शहराच्या बाहेरून आला असेल तर त्याच्याकडून कसे शुल्क आकारणार? गाडी कोणी व कधी लावली, हे कसे शोधणार, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होणार आहे. त्यामुळे या नियमाची अंमलबजावणी शक्य होणार नाही.- श्रीराम मोघे, नारायण पेठवर्दळीच्या रस्त्यांवर वाहन लावण्यासाठी शुल्क आकारण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल. मात्र, कमी रहदारीच्या, घराजवळ लावणाºया वाहनांवर शुल्क आकारणे चुकीचे आहे. नागरिकांचे खिसे खाली करण्याचा हा प्रकार आहे. ज्यांना पार्किंग नाही त्यांनी गाड्या नेमक्या लावायच्या तरी कुठे?- रामकुमार कुंभार (रिक्षाचालक, शिवाजीनगर)

टॅग्स :Parkingपार्किंगPuneपुणे