शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

नाशिक पॅटर्नवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: April 5, 2015 00:34 IST

सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी काँग्रेसला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेचा वाटा दिला आहे.

पुणे : सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी काँग्रेसला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेचा वाटा दिला आहे. त्यामुळे नाशिक पॅटर्न आता पुणे महापालिकेतही कायम झाला असून, राष्ट्रवादीला भविष्यात मदत करण्याच्या आश्वासनावर मनसेला शहर सुधारणा समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने शनिवारी झालेल्या निवडणुकीत मतदान केले. या समित्यांवर अनुक्रमे अ‍ॅड. रूपाली पाटील आणि अचर्ना कांबळे यांची अध्यक्षपदासाठी वर्णी लागली. तर विधी समिती आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे महेंद्र पठारे आणि सुनील गोगले यांची निवड झाली. मात्र, राष्ट्रवादीने मनसेचा पाठिंबा घेत त्यांनाही सत्तेत सहभागी करून घेतल्याने नाराज झालेल्या काँग्रेसने या चारही समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर बहिष्कार टाकत आपला राग व्यक्त केला आहे.मागील महिन्यात झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू होती. काँग्रेसला अध्यक्षपद देण्यासाठी राष्ट्रवादीने नकार दिल्याने कॉंग्रेसने परिवहन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का देत, शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीकडून विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस एवढेच संख्याबळ असलेल्या मनसेला हाताला धरत, कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी मनसेला दोन अध्यक्षपदे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, आज राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवारांना तर मनसेने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करत निवडून दिले.तर क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी मनसे आणि राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल न केल्याने भाजपाच्या नगरसेविका मनीषा चोरबेले या बिनविरोध निवडून आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी काम पाहिले. नगरसचिव सुनील पारखी, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, सेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपाच्या माजी गटनेत्या मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)काँग्रेसचा बहिष्कार या सर्व समित्यांमध्ये काँग्रेसचे प्रत्येकी २ नगरसेवक होते. त्यामुळे काँग्रेसला या समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यपक्षासाठी सूचक आणि अनुमोदक नसल्याने अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यातच समविचारी असलेल्या राष्ट्रवादीने मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, निवडणूक सुरू होताच विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, आपल्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचे सांगत निघून गेले.