शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 06:09 IST

गडचिरोलीतील सेवाकाळात त्यांनी काही गंभीर गुन्ह्यांची उकल केली.  तसेच नक्षली कारवायांवर प्रभावी नियंत्रण ठेवले. दोन महत्त्वाच्या खुनांच्या प्रकरणांत त्यांच्या तपास कौशल्याची विशेष दखल घेतली गेली.

पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पांडुरंग भोसले (वय ५२) यांचे कॅन्सरने निधन झाले. ते पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात मोठी शोककळा पसरली आहे.

भोसले यांची कारकिर्द पोलिस हवालदार म्हणून सुरू झाली होती. १९९४ मध्ये ते पोलीस हवालदार म्हणून पोलिस दलात रुजू झाले होते. त्यानंतर खात्या अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण करून २००४ मध्ये ते उपनिरीक्षक, तर २०१७ मध्ये पोलीस निरीक्षकपदी पदोन्नत झाले. गडचिरोली, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि आर्थिक गुन्हे शाखा अशा महत्त्वाच्या विभागांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

गडचिरोलीतील सेवाकाळात त्यांनी काही गंभीर गुन्ह्यांची उकल केली.  तसेच नक्षली कारवायांवर प्रभावी नियंत्रण ठेवले. दोन महत्त्वाच्या खुनांच्या प्रकरणांत त्यांच्या तपास कौशल्याची विशेष दखल घेतली गेली. वारजे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना खून, दरोडा, अपहरण, बलात्कार यांसह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करून ४०० पानांपेक्षा अधिक आरोपपत्र सादर करण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील यवत येथील सुपा घाट परिसरात रेकॉर्डवरील आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात असताना आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला होता. एक गोळी त्यांच्या डाव्या हातातून आरपार गेली. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ त्यांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला. या धाडसी कामगिरीबद्दल त्यांच्या राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकासाठी शिफारस करण्यात आली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Senior Police Inspector Sandeep Bhosale Passes Away; Mourning in Police Force

Web Summary : Senior Police Inspector Sandeep Bhosale of Pune Police passed away from cancer at 52. Known for his bravery, Bhosale served in Gadchiroli and Pune, solving serious crimes and controlling Naxal activities. He was known for his courage and dedication throughout his career.