शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'मोरुची मावशी'चे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 10:52 IST

मराठी रंगभूमीवर धुमशान करणाऱ्या, मैलाचा दगड ठरलेल्या 'मोरुची मावशी' या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे आज पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते.

पुणे - मराठी रंगभूमीवर धुमशान करणाऱ्या, मैलाचा दगड ठरलेल्या 'मोरुची मावशी' या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे आज पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते.  पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी (4 मे) सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील मुशाफिरीत त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांची 'कवडी चुंबक', 'राजाचा खेळ', 'मोरूची मावशी',  'बिघडले स्वर्गाचे दार' ही नाटकं विशेष गाजली. मोरूची मावशी या विनोदी नाटकाने रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 1984च्या 'पार्टी' आणि 1991च्या 'शेजारी शेजारी' या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या नाटकांसाठी त्यांनी काहीकाळ नेपथ्य आणि प्रकाशयोजनेचे काम केले होते. विजया मेहता यांच्या 'जास्वंद' नाटकामध्ये त्यांनी काम केले होते. 'चिरंजीव आईस' या भाग्यश्री देसाई निर्मित नाटकाचेदेखील ते दिग्दर्शक होते. मोहन वाघ यांच्याबरोबरही त्यांनी पुष्कळ नाटकं केली.  त्यामध्ये 'गोड गुलाबी' आणि ' गोष्ट जन्मांतरीची' या नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. कोल्हटकर यांचे सुरुवातीचे वास्तव्य मुंबईत होते, त्यानंतर ते 2002 नंतर ते पुण्यात आले.

दरम्यान, दिलीप कोल्हटकर यांच्या पश्चात सासू आणि मुलगी असा परिवार आहे. दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली यांची 9 फेब्रुवारी 2018ला हत्या झाली होती. त्यांच्या नोकरानेच संतापाच्या भरात गळा आवळून आणि डोक्यावर प्रहार करून दिपाली यांची हत्या केली होती.

दिलीप कोल्हटकरांना मानाचा मुजरा - पुरुषोत्तम बेर्डेदिलीप कोल्हटकर... तो नाटकाच्या रिहर्सलला आलेल्या मित्रांकडे नजर लावून बसायचा. ते कुठे दाद देतायत किंवा नाही याकडे लक्ष देऊन असायचा. अपेक्षेने मिष्किल हसायचा. मी त्याच्या  'कवडीचुंबक', 'बिघडले स्वर्गाचे दार', या  दोन नाटकांचं संगीत दिग्दर्शन  केले.  प्रायोगिक रंगभूमीवरुन कारकीर्द सुरु करुन  व्यावसायिक रंगभूमीवरवर ठसा उमटवणाऱ्या दिलीप कोल्हटकरला माझा मानाचा मुजरा.