शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
4
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
5
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
6
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
7
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
8
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
9
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
10
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
11
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
12
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
13
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
14
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
15
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
16
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
17
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
18
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
19
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
20
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

दौंड नगर परिषदेत ज्येष्ठ नगरसेवकांची खडाजंगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:53 IST

‘तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना’ हा  कटारिया आणि शेख यांचा फॉर्म्युला सभागृहातील दोन्ही गटातील  नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून माहीत आहे...  

ठळक मुद्देओपन स्पेसवरून विशेष सभेत वादावादी

दौंड : दौंड नगर परिषदेच्या विशेष सभेत ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख यांच्यात स्टेडियमच्या परिसरातील  ओपन स्पेसच्या संदर्भात खडाजंगी झाली.  यावेळी सभागृहात तणावाचे वातावरण झाले होते. दोघांनीही एकमेकांकडे हातवारे करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी नगर अध्यक्ष शीतल कटारिया मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्यासह दोन्ही गटातील नगरसेवक उपस्थित होते.    स्टेडियमच्या इनडोअरच्या सुधारित अंदाजपत्रकाचा विषय सभागृहात सुरू असताना गटनेते बादशाह शेख म्हणाले की, स्टेडियमच्या परिसरातील मोठ्या लेआऊटमधील (जिजामातानगर) ओपनस्पेस संबंधित मालकाकडूनदुय्यम निबंधकांसमोर अधिकृत दस्ताने घ्यायचे राहिलेली कारवाई प्रथम करा. कारण ती जागा नागरिकांना सोयीची आहे.  यावेळी बादशाह शेख यांच्या मुद्द्याला हरकत घेत प्रेमसुख कटारिया म्हणाले,  हा  विषय अजेंड्यावर नाही.  त्यामुळे हा विषय चर्चेत घेता येणार नाही. यावर बादशाह शेख म्हणाले, मी नगराध्यक्षांची  परवानगी घेऊन बोलत आहे. तुम्ही मला बोलण्यास मज्जाव करू नका. असे म्हणत दोघात शाब्दीक खडाजंगी झाली. एकमेकावर दोघेही हातवारे करीत असताना  सभागृहातील वातावरण तणावपुर्ण झाले होते.   मात्र, यावेळी नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी हस्तक्षेप करून या दोघांनाही शांत केले.  या विशेष सभेच्या सुरुवातीला नवीन साठवण तलाव ते जलशुद्धी केंद्रापर्यंत गुरुत्ववाहिनी टाकण्याचा विषय सुरू झाला. तेव्हा नगरसेवक  इंद्रजित जगदाळे म्हणाले की गुरुत्ववाहिनी टाकण्याच्या कामासाठी वनखात्याची परवानगी घेतली नव्हती. तेव्हा बजेटमध्ये तरतूद करा आणि नंतरच निर्णय घ्या.       बादशाह शेख म्हणाले, की याबाबत फेरनिविदा काढा दरम्यान प्रेमसुख कटारिया म्हणाले की, पाणी पुरवठ्यासंदर्भातील विषय आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तेव्हा पाणी पुरवठ्याबाबतचे काम रेंगाळत ठेवायचे की तातडीने करायचे, याचा विचार झाला पाहिजे.    यावर मुख्याधिकारी मंगेश शिंदे म्हणाले की, संबंधित ठेकेदार आहे. त्या परिस्थितीत जुन्या रेटने काम करायला तयार असेल तर  ठीक नाही तर  फेरनिवीदा काढू असे शिंदे म्हणाले. विषय पत्रिकेकेवरील सर्वच विषय या सभेत मंजूर करण्यात आले.     नगरसेवक जीवराज पवार, नगरसेवक गौतम साळवे यांनी चर्चेत भाग घेतला होता.......सभागृहात ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख यांच्यात हातवारे करीत शाब्दिक खडाजंगी सुरु होती. दरम्यान मुख्याधिकारी मंगेश शिंदे आणि काही अधिकारी  नगर परिषदेत नव्याने आलेल्या आहेत. तेव्हा त्यांना शेख आणि कटारिया यांचे साटेलोटे माहीत नसल्याने परिस्थिती भयानक वाटली. परिणामी हाणामारी होती की काय? असे वाटले होते. परंतु, विशेषसभा संपल्यानंतर उपस्थित नवीन अधिकारी मंडळीचा जीव भांड्यात पडला. ‘तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना’ हा  कटारिया आणि शेख यांचा फॉर्म्युला सभागृहातील दोन्ही गटातील  नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून माहीत आहे.  तेव्हा दोन्ही गटातील नगरसेवकांना शेख-कटारिया  या दोघांचा कलगीतुरा गमतीचा वाटत असल्याचे सभागृहातील चित्र होते. 

टॅग्स :Puneपुणे