शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सुहास परचुरे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 22:51 IST

डॉ. परचुरे यांनी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ची स्थापना केली होती.

पुणे : संपूर्ण हयात आयुर्वेदाच्या उत्कर्षा साठी खर्च करणारे सेवाव्रती, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य, ज्येष्ठ वैद्य डॉ. सुहास परचुरे यांचे मंगळवारी (दि.15) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. पुण्यात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने आयुर्वेदाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. 

डॉ. परचुरे यांनी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ची स्थापना केली होती. निमा तसेचआयुर्वेद रासशाळाच्या राष्ट्रिय शिक्षण मंडळाचे  माजी अध्यक्ष होते. ताराचंद धर्मार्थ आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटचे माजी व्यवस्थापकीय संचालक, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आयुर्वेद विभागाचे डीन, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य यासह अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत, अशी माहिती ताराचंद हॉस्पिटल चे सचिव डॉ. राजेंद्र हुपरिकर यांनी दिली. 

केंद्रीय आयुर्वेद परिषदेत असतांना त्यांनी महाराष्ट्रात आयुर्वेदाच्या नवीन महाविद्यालयांना कोणतीही अपेक्षा न ठेवता परवानगी दिली. त्यामुळे राज्यात आयुर्वेदाचे महाविद्यालये उभी राहू शकली. ते केवळ आयुर्वेद नव्हे तर सर्वसमावेशक पॅथीचे (इंटेग्रेटेड मेडिसिन) चे खंदे पुरस्कर्ते होते. आयुष डॉक्टरांची अडचणींवर त्यांनी नेहमीच शासनासोबत आयुष च्या बाजूने भांडण केले व त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली. 

अखेरच्या श्वासापर्यंत ते लिखाण, कार्यक्रम याद्वारे सक्रिय होते. कोरोनाच्या काळात त्यांनी आयुर्वेदिक औषधे ही प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त असल्याचे ठासून सांगितले. अनेकांना त्यांनी निरपेक्ष भावनेने मदत केली. तसेच आयुर्वेदात नामांकित डॉक्टरही घडवले अशी माहिती आयुष डॉ. संगीता वाघमोडे, डॉ. विक्रांत पाटील यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणे