शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याचा फोटो व्हाट्सअप वर पाठवा अन ५०१ रुपये बक्षीस मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:39 IST

ग्रामपंचायतचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जो कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करेल किंवा कामचुकारपणा करील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देखराबवाडी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ,कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पहिला उपक्रम

चाकण : एखाद्या वार्डात कचरा उचलला नसेल तर त्याचा फोटो सरपंचाच्या व्हाट्सअप वर पाठवा आणि ५०१ रुपये बक्षीस मिळवा, असे आवाहन खुद्द खराबवाडीच्या सरपंचांनी केले आहे. प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतर परिसरातील गावांनी कठोर निर्णय घेतले असून खराबवाडी ( ता.खेड ) येथील ग्रामपंचायतने प्लॅस्टिकचा वापर टाळणे, महिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण देणे व क्रांती महिला बचत गटास स्वस्त धान्य परवान्यासाठी परवानगी देणे आदी उपक्रम हाताळणार असल्याचे सरपंचांनी सांगितले. यावेळी महिलांनी या ठरावास हात वर करून एकमुखाने मंजुरी दिली व प्लॅस्टिक वापरण्याची शपथ घेतली. यावेळी सरपंच खराबी म्हणाले, आम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा पहिला उपक्रम हाती घेतला. कारण ग्रामपंचायतचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जो कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करेल किंवा कामचुकारपणा करील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचारी दिवसभरात जे काम करतील त्याची नोंद ठेवणार आहे. सफाई कामगारांनी वार्डात साफसफाई करून कचरा उचलल्यानंतर त्या वार्डातील सदस्य किंवा जबाबदार व्यक्तीची सही घेण्यास सांगितले आहे. जर सही घेतली नाही तर त्या दिवसाचा पगार कपात करण्यात येणार आहे. सफाई कामगार कचरा उचलत नसेल तर नागरिकांनी आपापल्या वार्ड सदस्याकडे तक्रार करावी. अथवा कचऱ्याचा फोटो आमच्या व्हाट्सअपवर पाठवा, कचऱ्याचा फोटो पाठविणाऱ्या महिलेस ५०१ रुपयांचे रोख बक्षीस ग्रामपंचायच्या वतीने दिले जाईल. कर्मचाऱ्यांच्या शिस्ती बाबत कडक भूमिका घेतल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ते पुढे म्हणाले, गाव तंटामुक्त राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. गावातील तंटे गावातच सोडवू, वेळप्रसंगी तंटा करणाऱ्यांचे पाय धरू, त्यासाठी मी सरपंच म्हणून २४ तास आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. यावेळी गावातील सर्व महिलांच्या वतीने उद्योजक अरुण जांभुळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  

टॅग्स :Chakanचाकणgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच