शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमध्ये मुरुमाची भेसळ करून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:56 IST

बेकायदा धंदा तेजीत : पर्यावरणास धोका तस्करांची नजर नदी, ओढे, गायरानावर

टाकळी हाजी : वाळूचा साठा कमी झाल्यामुळे, वाळूचे भाव गगनाला भिडले असून, उपलब्ध वाळूमध्ये मुरूम एकत्र करून विकण्यांचा धंदा शिरूर तालुक्यातील वाळूतस्कर मोठ्या प्रमाणात करू लागल्याने, नदी, ओढे पाठोपाठ सरकारी, गायरान जमिनीवर तस्करांची नजर गेली असून, पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

म्हसे (ता. शिरूर) येथे सरकारी गायरान जमिनीमध्ये दोन दिवसांपूर्वी सुमारे ५७५ ब्रास मुरुम वाळू तस्करांनी चोरला असल्याची मोठी कारवाई तहसीलदार रणजित भोसले यांनी केली असल्यामुळे मुरूम चोरणाऱ्यांमध्ये खळबळ झाली आहे. हा पंचनामा जरी ५७५ ब्रासचा केला असला तरी प्रत्यक्षात ते एक ते दीड हजारपेक्षा जास्त मुरुम येथून उपसा झाल्याचा अंदाज ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. पुण्यामधे वाळू साडेसात हजार रुपये ब्रासने विकली जाते. अनेक वर्षे वाळूचे लिलाव झाले नाहीत, त्यामुळे वाळूतस्करांनी वाळूमध्ये मुरुम एकत्र करून, विकण्याचा जोरदार धडाका लावला आहे. मुरुमाला वाळूची किमंत मिळू लागल्याने ग्रामीण भागात मुरूमचोरांचे प्रमाण वाढले आहे. गावाच्या जवळपास सरकारी गायरान जमिनी, वन विभागाच्या जमिनीवर तस्करांचा मोर्चा वळला असून, गावठाणेसुद्धा मुरुम उपशाने खड्डेमय झाले आहे. स्थानिक पातळीवर दोन हजार रुपये ब्रासने मुरुम विकला जातो. हा मुरुम चाळून वाळूत टाकला जातो, त्यातून रात्रीत प्रतिब्रास साडेसात हजारांची कमाई होते.नद्या, ओढे यांची दिवस-रात्र वाळू चोरून नद्यांचे वाळवंट झाले, असताना आता सरकारी जमिनीमधून जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने मुरुमचोरी सुरू असल्याने, महसूल विभागाने कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करतात.तालुक्यातील काही सरकारी जमिनी ग्रामपंचायतीकडे असूनदेखील मरूमचोरीबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्तकरीत आहे.पोलीस पाटील कागदावरच...प्रत्येक गावात पोलीसपाटील असून, त्यांना शासनाचा पगार दिला जातो, मात्र ते वाळू, मुरुम, उत्खननाबाबत कोणतीही माहिती महसूलला देत नाहीत, काही पाटील गावाबाहेर शहरात राहतात, त्यांच्यावर महसूल प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :sandवाळूPuneपुणे