शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ सर्वेक्षण’साठी शिरवलीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:38 IST

येथे ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१८’ या कार्यक्रमांतर्गत केंद्र स्तरावरून स्वच्छ सर्वेक्षण अभियान पाहणी कार्यक्रम घेण्यात आला होता.

सांगवी : शिरवली (ता. बारामती) येथे ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१८’ या कार्यक्रमांतर्गत केंद्र स्तरावरून स्वच्छ सर्वेक्षण अभियान पाहणी कार्यक्रम घेण्यात आला होता. स्वच्छता सर्वेक्षणात केंद्र स्तरातून बारामती तालुक्यातून शिरवली गावाची केंद्र स्तरावरून सोडत पद्धतीने स्वच्छता सर्वेक्षण करण्यासाठी निवड करण्यात आली होती.

आयएमआरबी संस्थेच्या मीना सस्ते, स्वच्छ भारत अभियान जिल्हा समन्वयक विक्रम शिंदे, संतोष अवघडे, बारामती पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे, यांनी स्वच्छता सर्वेक्षण पाहणी केली. १ आॅगस्टपासून विविध स्वच्छतेसंबंधी कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरवून दिले होते. त्यानुसार प्रत्येक गावात १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्टपर्यंत ज्या काही गावांत स्वच्छतेसंबंधी काही त्रुटी असतील त्या पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सुचविण्यात आले होते. स्वच्छतेसंबंधी जागोजागी फलक लावून, अंगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्र, मंदिरे या ठिकाणी प्रभात फेरी काढून घेण्यात आली. सर्व ठिकाणी शौचालयाचे दुरुस्ती बांधकाम तसेच त्याची व्यवस्था चांगली करण्यात आलेली होती. तसेच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय पद्धतीने प्रकिया, ओला व सुका कचºयाचे योग्य नियोजन, ग्रामस्थ सार्वजनिक शौचालयांचा वापर व व्यवस्थापन स्वत: करतात, तसेच शाळेतील भिंतीवर बोलक्या चित्रांद्वारे स्वच्छतेचे संदेश दिले होते. सरपंच रेश्मा पोंदकुले व ग्रामसेवक सुजाता संदीप आगवणे व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.या वेळी विस्तार अधिकारी वाघ, उपसरपंच राजेंद्र बांदल, सदस्य अविनाश राऊत, अनिता पोंदकुले, सविता परदेशी, रूपाली कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष मदने, पोलीस पाटील नितीन घनवट, ग्रामीण स्वछता व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष मेघश्याम पोंदकुले, अजित गुरव, बापूराव ननवरे, सुनील जगताप, शिवाजी पोंदकुले यांच्यासह ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, सर्व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान