शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तेलगीच्या स्थावर मिळकती जप्त करा, पत्नी शाहिदा हिची न्यायालयाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 02:21 IST

बनावट मुद्रांक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीने गैरव्यवहाराच्या पैशातून मिळविलेल्या स्थावर मिळकती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त कराव्यात, अशी मागणी तेलगी याची पत्नी शाहीदा हिनेच केली आहे.

पुणे : बनावट मुद्रांक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीने गैरव्यवहाराच्या पैशातून मिळविलेल्या स्थावर मिळकती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त कराव्यात, अशी मागणी तेलगी याची पत्नी शाहीदा हिनेच केली आहे. येथील विशेष मोका न्यायालयात केलेल्या अर्जात सीबीआयने बनावट मुद्रांक गैरव्यवहाराचा फेरतपास करावा, अशी मागणी करुन ‘हे जर मी केले नाही तर मला अल्ला माफ करणार नाही’, असेही म्हटले आहे़अ‍ॅड. मिलींद पवार, अ‍ॅड. प्रशांत जाधव यांच्यामार्फत शाहिदा हिने हा अर्ज केला आहे. तेलगीने बनावट मुद्रांक गैरव्यवहारातून कमावलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणातील स्थावर मिळकती घेतल्या. अद्यापही अनेक मिळकती सीबीआयकडून जप्त करावयाच्या राहिल्या आहेत. सीबीआयने फेरतपास व खातरजमा करून या मिळकती सरकार जमा कराव्यात, असे नमूद केले आहे.बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटल्यात अब्दुल करीम तेलगीसह काही जणांनी आपला गुन्हा कबुल केल्यावर न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली़ ज्यांनी गुन्हा अमान्य केला त्या आरोपींवर येथील विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश एस़ एच़ ग्वालानी यांच्या समोर खटला सुरू आहे़़ सरकार पक्षाचे वतीने साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम चालू आहे. खटल्यातील मुख्य आरोपी तेलगीचे न्यायालयीन कोठडीत बंगळुरु येथे कारागृहात असताना निधन झाले. शाहीदा तेलगी ही जामीनावर असून सध्या खानापूर, बेळगाव येथील मूळ गावी वास्तव्यास आहे.सीबीआयने आपले म्हणणे सादर करावेशाहिदा तेलगी हिच्या वतीने अ‍ॅड़ मिलिंद पवार यांनी शनिवारी न्यायालयात एक अर्ज सादर केला़ या अर्जात तेलगीच्या मृत्यूनंतर कर्नाटक राज्यातील बेळगाव, खानापूर व इतर काही स्थावर मिळकती आहेत़ ज्या तेलगीने खरेदी केलेल्या आहेत़ ज्याच्या आयकर विभागाकडे नोंदी आहेत़ त्यावर तेलगीने आयकर भरलेला आहे. त्या कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर खरेदी केल्या आहेत, असे म्हटले आहे. विशेष मोका न्यायालयाने या अर्जावर सीबीआय व सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्यास सांगितले. पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे़तेलगीने देशात जवळपास ६० हजार कोटींचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार केल्याने खळबळ उडाली होती. गैरव्यवहाराची व्याप्ती जवळपास १३ राज्यांत पसरली होती. अनेक बडे पोलीस अधिकारी, राजकीय नेते यांना अटक करण्यात आली. शाहीदा तेलगी हिने देखील तिचा पती व बनावट मुद्रांक गैरव्यवहार मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीला गुन्हा करणेकामी मदत केली असा तिच्यावर आरोप असून खटल्याची सुनावणी अद्याप चालूच आहे.

टॅग्स :Puneपुणे