लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका सराफाला मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देऊन वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे . त्याला न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अमित सतीश कांचन (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. या पूर्वी या प्रकरणातील पहिला आरोपी दीपक गजानन धनकुडे याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार आहेत. (वार्ताहर)
खंडणी प्रकरणातील दुसरा आरोपी जाळ्यात
By admin | Updated: January 26, 2015 01:17 IST