शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा : अब्दूर रेहमान : हॅम रेडिओ क्लबचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 18:29 IST

रेडिओचे जनक सर जगदीशचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र व मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिका केंद्रात उभारण्यात आलेल्या हॅम रेडिओ क्लबचे उद्घाटन अब्दूर रहेमान यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देसुधीर फाकटकर यांचे ‘रेडिओचा जनक : सर जगदीशचंद्र बोस’ यावर सचित्र व्याख्यानविलास रबडे आणि सहकाऱ्यांनी दाखवली हॅम रेडिओची प्रात्यक्षिके

पुणे : ‘देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. त्याच जोरावर अनेक वैज्ञानिकांनी मोलाचे योगदान दिले. आजच्या पिढीने शालेय वयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला, तर भारत जलद गतीने महासत्ता बनू शकेल’, असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस वायरलेस विभागाचे पोलीस महानिरीक्षक अब्दूर रहेमान यांनी केले.रेडिओचे जनक सर जगदीशचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र व मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिका केंद्रात उभारण्यात आलेल्या हॅम रेडिओ क्लबचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी खोडद येथील जीएमआरटीचे तंत्रज्ञ सुधीर फाकटकर यांचे ‘रेडिओचा जनक : सर जगदीशचंद्र बोस’ यावर सचित्र व्याख्यान झाले. यावेळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप, भारतीय विद्याभवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिका केंद्राचे संचालक अनंत भिडे, इनोव्हेशन हबचे उपसंचालक संदीप नाटेकर, हॅम आॅपरेटर विलास रबडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.रेहमान म्हणाले, ‘दहशतवादी कारवायांचा कट रचणाऱ्या, अफवा पसरवणाऱ्या आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या वाईट प्रवृत्तींचा तात्काळ शोध घेता यावा, कायदा व सुव्यस्था सक्षम ठेवता यावी, यासाठी लवकरच मोबाईल लोकेटरची सुविधा उभारली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा वायरलेस विभाग अतिशय सक्षम आहे. इतर राज्यातील अनेक पोलीस येथे प्रशिक्षणासाठी येतात. वायरलेस यंत्रणेला अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’संदीप नाटेकर यांनी प्रास्ताविक केले. विश्वास काळे यांनी त्या काळातील इतर वैज्ञानिकांचे योगदान सांगितले. डॉ. गोविंद स्वरूप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाग्यश्री लताड यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा कुलकर्णी यांनी आभार मानले. 

 

बोस यांच्यामुळे तांत्रिक संवादाची दारे खुलीसर जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओचा शोध लावला. मात्र, या शोधनाचा मानवजातीला अधिक फायदा झाला पाहिजे, या हेतूने त्यांनी त्याचे अधिकार नोंदवले नाहीत. परिणामी पुढे मार्कोनीने त्यात काही सुधारणा करत रेडिओचा शोध आपल्या नावावर नोंदवला. परंतु, बोस यांनी मार्कोनीच्या कित्येक वर्षे आधीच तांत्रिक संवादाची दारे खुली केली होती. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र यासह इतर अनेक विषयात बोस यांचा सखोल अभ्यास होता. ते व्यासंगी साहित्यिकही होते, असे सुधीर फाकटकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. विलास रबडे आणि सहकाऱ्यांनी हॅम रेडिओची प्रात्यक्षिके दाखवली. 

टॅग्स :Puneपुणे