शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बुद्धिमत्ता असल्यास शास्त्रज्ञ होता येईल : अधिकराव जाधव; पिंपरीत विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:34 IST

विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थांच्या संकल्पना बाहेर येतात व त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतात, असे उद्गार सेरिकल्चरिस्ट व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अधिकराव जाधव यांनी काढले.

ठळक मुद्देरेशिम उद्योगात प्रचंड आर्थिक फायदा, विद्यार्थ्यांनी त्यात करिअर करावे : अधिकराव जाधवविज्ञान प्रदर्शनात विद्यार्थांनी सादर केले शंभराहून अधिक प्रकल्प

पिंपरी : मोठे शास्त्रज्ञ होण्यासाठी युरोप-अमेरिकेतच जावे लागते असे नाही़ तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे़ फक्त सातत्याने कष्ट केल्यास तुम्ही येथेही शास्त्रज्ञ होऊ शकता. विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थांच्या संकल्पना बाहेर येतात व त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतात, असे उद्गार सेरिकल्चरिस्ट व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अधिकराव जाधव यांनी काढले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.आपल्या भाषणात ते म्हणाले, रेशिम उद्योगात प्रचंड आर्थिक फायदा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी रेशीम उद्योगाचा अभ्यास करावा व त्यात करिअर करावे. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी तुतीची लागवड, जगभरातील रेशीम उद्योगाची स्थिती व रेशीम उद्योगाचे इतर अनेक फायदे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले, ‘‘विज्ञान प्रदर्शन ही एक विद्यार्थांसाठी संधी असते़ जो तिचा फायदा घेतो तो पुढे मोठा शास्त्रज्ञ होऊ शकतो.’’विज्ञान प्रदर्शनात महाविद्यालयातील व नवमहाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थांनी शंभराहून अधिक प्रकल्प सादर केले व परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञान