शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

शिक्षकेतर कर्मचा-यांचे ९ जुलैपासून राजव्यापी धरणे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 15:58 IST

शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीवर गेल्या १५ वर्षापासून बंदी असल्यामुळे शाळांतील प्रशासकीय व त्या अनुषंगाने कामे ठप्प झाली आहेत.

ठळक मुद्देनागपूर येथे पावसाळी अधिवेशन काळात राजव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार

पुणे :  राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. शासनाने दरवेळी आश्वासने देवून शिक्षकेत्तर कर्मचा-यांची बोळवण केली आहे. सरकार कर्मचारी आणि संघटना यांची दिशाभूल करत असून त्याच्या निषेधार्थ सोमवार यशवंत स्टेडियम नागपूर येथे पावसाळी अधिवेशन काळात राजव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीवर गेल्या १५ वर्षापासून बंदी असल्यामुळे शाळांतील प्रशासकीय व त्या अनुषंगाने कामे ठप्प झाली आहेत. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मोर्चा, धरणे, घंटानाद, झोपमोड आंदोलने, उपोषण अशा प्रकारची वेगवेगळी आंदोलने केली असून शाळेत कर्मचारीच नसल्याने शालेय कामकाज करणे अवघड झाले आहे. माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी उठवून शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी, केंद्र व राज्य शासनाप्रमाणे शिक्षकेतरांना २४ वर्षानंतरची दुसरी कालबध्द पदोन्नती विना अट त्वरीत लागू करावी, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची अतिप्रदान रक्कम वसुली थांबविण्यात यावी आणि राज्यातील शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना तात्काळ मान्यता देण्यात याव्यात. आदी मागण्या संघटनेच्या असून या आंदोलनास राज्यभरातून सर्व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ....................................... 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी