शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पालावरची बिनभिंतीची शाळा! एक अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 04:29 IST

ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजातील असा एक उपेक्षित घटक म्हणजे पोतराज.

- सुनील जगतापउरुळी कांचन : ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजातील असा एक उपेक्षित घटक म्हणजे पोतराज.अशा उपेक्षित समाजाच्या आयुष्यात नवचैतन्य आणण्याचे काम सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रांजली चौधरी (ढगे)या करीत आहेत. प्रांजली या समाजातील नव्या पिढीला अक्षरओळख करून देऊन त्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकारदूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्या समाजात एक नवचैतन्य आणायचे काम करीत आहेत. यामागेत्यांचे प्रयोजन काय असे विचारले असता, केवळ आनंद व या उपेक्षित समाजाची शैक्षणिक परवड थांबविताना मिळणारे मानसिक समाधान वेगळेच असल्याचेमत प्रांजली चौधरी (ढगे) यांनीव्यक्त केले.याबद्दल अधिक माहिती देताना प्रांजली म्हणाल्या की, आमच्या वस्तीवर डोंगराच्या बाजूला असलेल्या माळरानावर आपली पालं टाकून ही दहा-बारा कुटुंबं दरवर्षी काही काळ राहायला येतात. यात एक वर्ष वयापासून अठरा-वीस वयाच्या मुला-मुलींचा समावेश आहे. मात्र, त्यांचा अबकड या मराठी भाषेतील बाराखडीतील अक्षरांशी कसलाच संबंध आलेला नसल्याने दैनंदिन जीवनात वावरताना त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते आणि काही वेळा फसवणूक, अडवणूक वा काही अपमानालाही सामोरं जावं लागतं.या गोष्टी ध्यानात घेऊन प्रांजली चौधरी (ढगे) यांनी त्या खासगी कंपनीतील आपले काम संपवून घरी आल्यावर या मुला-मुलींशी जवळीक साधून त्यांची शिक्षणाच्या बाबतीत काय अडचण आहे व ती कशी दूर करायची याबाबत माहिती घेतली आणि नंतर त्यांच्या अनपड आई-वडिलांशी चर्चा करून त्यांना दररोज सायंकाळी अबकड शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या माळावरच्या बिनभिंतीच्या शाळेत एक एक करत जवळपास २५ मुलं-मुली शिकू लागली व त्यांच्या आयुष्याच्या नव्या बदलाची खरी सुरुवात झाली.कामाचं चीज होतंयया शाळेत शिकायला वयाची अट नसल्याने एक लग्न झालेली जोडी पण अबकड शिकत आहे आणि आपली मुले शिकत असताना बघून त्यांचे अशिक्षित आई-वडील पण समाधानी झाल्याचा वेगळाच अनुभव या ठिकाणी पाहायला मिळत आहे.यांचा अनुभव विचारले असता त्या म्हणाल्या, की मुलांना शिक्षणाची आवड आहे. अभ्यासाची गोडीही निर्माण झाली आहे आणि मुलांची लिखाण व वाचनात छान प्रगती होत असताना दिसत आहे. त्यांचे अक्षरही मोत्यासारखे आहे. मुलांची आकलनशक्ती वाढलेली आहे. त्यांच्यातील सुप्त गुण हळूहळू विकसित होत असताना दिसत आहेत. यामुळे आपणकरत असलेल्या कामाचं चीजहोत आहे याचं समाधान काही वेगळंच आहे..प्रांजलीच्या कार्यामुळेअनेक निरागस मुलांच्या आयुष्यात सोनेरी पहाटयेऊन त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळेल हेमात्र निश्चित.

टॅग्स :Schoolशाळा