शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"दूध व पोषण आहार पुरवठ्यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा, राज्यातील सरकार दलाली सरकार"

By निलेश राऊत | Updated: March 22, 2024 12:58 IST

पुणे : राज्यातील आदिवासी शाळेतील दूध पुरवठ्यामध्ये व समाज न्याय विभागाकडून होणाऱ्या पोषण आहार वितरणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात ...

पुणे : राज्यातील आदिवासी शाळेतील दूध पुरवठ्यामध्ये व समाज न्याय विभागाकडून होणाऱ्या पोषण आहार वितरणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, निनावी व्यक्तीने मला ११ फाईल पाठवल्या आहेत. त्यातील केवळ दोन फाईल मी आणल्या असून, यात आदिवासी आश्रम शाळेतील दुध पुरवठ्याची आहे. यात विद्यार्थ्यांना २०० मीली दुध पुरवले जाते व यासाठी पहिला करार २०१९ चा आहे. या करारात ४६.४९ रुपये दर होता. चितळे, महानंद यांचा. अमुलचा दर ४९. ७५ पैसे होता. त्या दराने दुध पुरवठा होत होता. परंतु, २०२३-२४ मध्ये मात्र हा दर १४६ रुपये दर झाला आहे. १६४ कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. एवढ्या महागड्या दराने दुध खरेदी करून हे सरकार आदीवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुरवत आहे का, असा प्रश्न करून त्यांनी यात ८० कोटी रुपयांची दलाली दिली गेली असल्याचा आरोप केला. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खाजगी दुध डेअरी आणि कोल्हापुर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दुध संघाला हे काम दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पवार यांनी दुसरी फाईलही उघड केली. यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह आणि निवासी शांळामधील भोजन पुरवठ्याच्या टेंडरमध्ये २५ टक्के दलाली दिली गेली असल्याचा आरोप केला. एक हजार ५० कोटी रुपयांचे हे टेंडर असून, यात चार कंपन्या आहेत. ज्यांचा लाड पुरवला गेला असल्याचे सांगून त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली. ब्रिक्स इंडीया, बीव्हीजी, ई- गव्हर्नन्स या इतर तीन कंपन्या असून, या कंपन्यांना पोषक आहार पुरवन्याचा अनुभव नसल्याचे सांगत त्यांनी याविरोधात पीएमओ, सीएमओ, ॲन्टीकरप्शनकडे तक्रार देणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान ब्रीक्स इंडीया कंपनीचे संचालक हसन मुश्रीफ यांचे जावई असून, ब्रीक्स इंडीया कंपनी स्वच्छतेचे काम करते. पण ही स्वच्छतेची कामे करता करता ही कंपनी सरकारची तिजोरी साफ करायला लागली असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला

केजरीवाल यांची अटक म्हणजे हुकुमाशीला सुरुवात :

कुठलेही पुरावे नसताना एका मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते. २०२४ नंतर काय होईल याची ही सुरुवात आहे. पण आम्ही सर्व जण अरविंद केजरीवाल सोबत आहोत. केवळ दडपशाही करणारे हे भाजप सरकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

हे दलाली सरकारशेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये अनुदान द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत. पण खाजगी दुध कंपनीला १०० कोटी रुपये दलाली द्यायला पैसे आहेत. परीक्षा शुल्क १००० रुपयांवरुन १०० रुपये करा, अशी मागणी आम्ही केली होती. सरकारने सांगितले पैसे नाहीत. पण पोषण आहार पुरविणाऱ्या कंपन्यांना दलाली द्यायला पैसे आहेत. हे सरकार २५ ते ५० टक्के दलाली घेत असून हे दलाली सरकार असल्याचे पवार म्हणाले

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArvind Kejriwalअरविंद केजरीवाल