सवाई महोत्सवातील स्वरानंद!

By Admin | Published: December 13, 2014 12:13 AM2014-12-13T00:13:40+5:302014-12-13T00:13:40+5:30

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात स्वरानंद घेण्यासाठी पुणोकर मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. सूर, तालावर मंत्रमुग्ध होणा:या या सुरमयी पर्वणीतला अनुभव काही औरच!

Sawai Mahotsav Swaranand | सवाई महोत्सवातील स्वरानंद!

सवाई महोत्सवातील स्वरानंद!

googlenewsNext
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात स्वरानंद घेण्यासाठी पुणोकर मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. सूर, तालावर मंत्रमुग्ध होणा:या या सुरमयी पर्वणीतला अनुभव काही औरच!  अनेक गायकांच्या दज्रेदार गायनाने महोत्सवाने एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यातील काही विशेष क्षण..
 
मंगलमय सुंद्रीवादन
62व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथम सादरीकरण करणारे भीमण्णा जाधव आणि त्यांच्या साथीदारांनी महोत्सवाची सुरुवात अतिशय सुरेल आणि आनंददायी केली. सूरमणीप्राप्त भीमण्णा स्वरांमध्ये ईश्वर आहे, असे मानतात आणि वादनातून त्याची प्रचितीही आली. आपले वडील पं. चिदानंद जाधव आणि आजोबा सिदराम जाधव यांच्या संस्कारात वाढल्याने त्यांची लहान वयातच उत्तम तयारी झाली. त्यांनी राग भीमपलास गायकी अंगाने पेश केला. रागस्वरूप जपणो, तालात चूश्त अशी बंदिश (गत) मांडणो, पुकारबरोबरच रंजकतेचे भान ठेवणो इत्यादी वैशिष्टय़े त्यांच्या वादनात आढळली. स्वरांवर व ताललयीवर जेवढी हुकमत तेवढेच प्रेमही दिसून आले. शेवटी त्यांनी एक धून सादर करून वादन संपविले. या वाद्यावर तंतकारी वाजवण्याचा प्रय}ही चांगला होता. त्यांना तबल्यावर उत्तम साथ-ांगत पं. शांतिलिंग देसाई यांनी केली, तर सुंद्रीवादनाची साथ यशवंत जाधव यांनी केली. व्हायोलिनवर देवदत्त जोशी, तर तानपु:यावर पं. सातलिंगप्पा सायपल्लू यांनी साथ केली.
 
सानिया पाटणकर यांचे तयारीचे गायन
सुंद्रीवादनानंतर पुण्यातील तरुण-तडफदार गायिका सानिया पाटणकर या रंगमंचावर आल्या. अनेक तरुण कलाकारांचे या स्वरमंचावर गाण्याचे स्वप्न असते तसे सानियाचेही होते, ते साकार झाले. अशा रंगमंचावर गाण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी गंभीर व भक्तिरसप्रधान राग ‘श्री’ निवडला. कोमल रिषभाच्या लगावामुळे हा राग अंत:करण व्याकूळ करून टाकतो. प्रत्येक स्वराशी कोमल रिषभाचे नाते जणू अतूट असेच असते. परे, मरे, मपधमरे, पनिसारेनिधप अशा स्वरसंगतींनी रागरूप साकारले. त्यांची आवाजाची उत्तम देण, तिन्ही सप्तकांत सहज फिरणारा आवाज, दाणोदार व चपळतेने फिरणारी तान इ. वैशिष्टय़े सांगता येतील. गायनात ठेहरावाचे प्रमाण वाढले, तर गाणो हृदयस्पर्शी होऊ शकेल. गायनात, गुरू अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनशैलीची आठवण झाली. राग ‘श्री’मध्ये विलंबित त्रितालातील पारंपरिक ख्याल ‘कहॉँ मैं गुरु ढुंडन जाऊं’ सादर केला. मिश्रखमाजमधील टप्पा गायन विशेष दाद देऊन गेले. हा टप्पा संवादिनीवादक चैतन्य कुंठे यांनी बांधला आहे.‘रूप पाहता लोचनी’ या रूपाच्या अभंगाने रंगतीचा कळस अधिकच चढत गेला. तबलावादक अविनाश पाटील आणि संवादिनीवादक रोहित मराठे, तानपुरा साथ श्रुती अभ्यंकर, प्रीती सोहनी, सुगंधा उपासनी यांनी केली.
 
रंगतदार 
जुगलबंदी
जुगलबंदी म्हणजे युगुलगान. यालाच सहगायनही म्हणतात. फार कमी प्रमाणात ऐकायला आणि बघायला मिळते. या वर्षी प्रथमच युवा कलाकार दिवाकर आणि प्रभाकर कश्यप यांनी गायन सादर केले. राग ‘अमीर प्रिया’ सादर केला. राग मधुर आहे; परंतु रसिकांना हे नाव अपरिचित असल्याने तेवढे उत्साहाने स्वागत झाले नाही. हा उ. अमीर खॉँसाहेबांनी तयार केलेला राग असून, सा ग म प नि सा अशा स्वरूपात दाक्षिणात्य संगीतात जास्त प्रचलित आहे. यामध्ये विलंबित झपतालामध्ये ‘नंदकिशोर रंगरसिया’, तर ‘प्रीत रीत ना द्रुत  बंदिश तयारीने सादर केली. तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा आवाज, तानांची उत्तम तयारी, स्वर-तालावर हुकूमत, नोटेशन (सरगम)ची वैशिष्टपूर्ण मांडणी ही त्यांची जमेची बाजू होती. रसिकांना गायन आवडल्याने गाण्याचा आग्रहही झाला. परंतु. वेळेअभावी गायन थांबवावे लागले.लहार्मोनियम साथ संतोष घंटे यांनी गायनास पोषक अशी केली. या दोघांच्या सुसंगतीमुळे गायन अधिकाधिक रंगत केले.
 
चैतन्यमय संतूरवादन
प. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याच्या माध्यमातून संगीत परंपरा अतिशय समृद्ध केली आहे. संतूर म्हटले की पंडितजी आणि पंडितजी म्हटले की संतूर, असा जगभर असलेला मानसन्मान या वाद्याला पंडितजींनी मिळवून दिला आहे. सवाई महोत्सवात प्रत्येक वर्षी रसिक त्यांचे सूर ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. याही वर्षीह त्यांनी सर्वाच्या आवडीचा राग चारूकेशी सादर केला. हमखास रंगणा:या या रागामध्ये त्यांनी संथ आलाप, जोड आणि झाला सादर केला. जो की, ध्रुपद-धमार शैलीतून आलेला आहे. ध नि सा रे ग रे, ग रे नि ध ध ग रे ग सा, ध नि सा ध प, म ग रे ग सा, (म) सा ध नि ध सा अशा आकर्षन स्वरसंगतींनी रागरूपाने माहोल उभा केला. रूपक तालातील गातीने राग रंगत गेला आणि द्रुत व अति द्रुत लयीतील गतीने रसिक मंत्रमुग्ध झाले. पं. विजय घाटे यांनी अप्रतिम तबला संगत केली. पंडितजींच्या वादनाला कधी हळुवार, तर कधी जोरकस असे संवाद करत कार्यक्रमाला तेजदार बनवले. पंडितजींना तानपुरा साथ त्यांचे पट्टशिष्य दिलीप काळे यांनी केली. पंडितजींनी मिश्र पहाडी धून वाजवून वादनाला विराम दिला.
 
संगीतमरतड पं. जसराज यांच्या शिष्यांची मैफल 
गेली काही दशके पं. जसराज यांनी आपल्या गायकीने रसिकांना वेड लावले. गोड आवाज, मधुर गायनशैली, तिन्ही सप्तकांतील अदाकारी, रंगदार सरगम. सर्व काही अलौकिक व अभिजातही. अशा गायनाची आतुरतेने वाट बघाणारे रसिक काहिसे नाराज झाले; परंतु पंडिजींचे दर्शन होणो हेही काही कमी नाही. निसर्गापुढे माणूस काहीच नाही. पंडिजींना प्रकृती-अस्वास्थ्य. त्यामुळे गाता येत नाही, याचा त्रस आपल्यापेक्षा त्यांना जास्त होत असावा म्हणून ते बोलूनही गेले, की आता नवीन गायकांनी पुढे येऊन परंपरा वाढवावी किंवा कायम तरी ठेवावी. पंडितजींनी असा इतिहास घडवला आहे, की त्यांच्या संवादातूनही (बोलवण्याच्या) मैफल रंगत गेली.पंडितजींनी अजरामर केलेल्या बंदिशीचे सादरीकरण रसिकांसाठी मेजवानी ठरली. ‘अल्ला मेहरबान जोरी बाजे कोई नहीं है अपना। या बंदिशीचे गायन तृप्ती मुखर्जी, प्रीतम भट्टाचार्य यांनी अतिशय नजाकतीने सादर केले. या कलाकारांना उत्तम आवाजाची देण लाभली आहे. परंपरा, समज, तानेची फिरतही उत्तम आहे. पं. रतन मोहन शर्मा यांनी तराना सादरीकरण केले. तराना गायकी, उपज ख्यालापेक्षा वेगळी असते त्याचे दर्शन घडविले. या रंगलेल्या मैफलीची सांगता ‘गुरु की महिमा’ या भजनाने झाली. या मैफलीला उत्तम साथसंगत तबला- राजकुमार शर्मा, तर संवादिनी- मुकुंद पेटकर यांनी केली.

 

Web Title: Sawai Mahotsav Swaranand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.