शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जलसाक्षरता प्रसारासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नवा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:11 IST

पुणे विद्यापीठामध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून जलव्यवस्थापन आणि स्वच्छताविषयक पदवी व पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

ठळक मुद्देअभ्यासक्रमांसाठी नेदरलँडमधील ‘आयएचई डेल्फ्ट’ आणि ‘युनिटी नॉलेज’ या संस्थांशी सामंजस्य करारएम. एसस्सी.’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून विज्ञान व अभियांत्रिकीचे पदवीधर पात्र

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून जलव्यवस्थापन आणि स्वच्छताविषयक पदवी व पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाकडून जलसाक्षरतेच्या प्रसारासाठी भरीव काम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.नवीन अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने नेदरलँडमधील ‘आयएचई डेल्फ्ट’ आणि ‘युनिटी नॉलेज’ या संस्थांशी सामंजस्य करार केला असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. यावेळी ‘आयएचई डेल्फ्ट’चे रेक्टर डॉ. एडी मूर्स, डॉ. नेमान्या ट्रिफूनोव्हीक, ‘युनिटी नॉलेज’च्या संस्थापक संचालिका अनघा पाठक, युनिटी कन्सल्टट्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश पाठक, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम आदी उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून चालु शैक्षणिक वर्षापासून गाळ व्यवस्थापनावर पहिला आॅनलाईन अभ्यासक्रम तसेच एकात्मिक नगर जल व्यवस्थापन या विषयावर पदव्युत्तर पदवी (एम.एसस्सी.) अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. ‘एम. एसस्सी.’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये प्रवेशासाठी विज्ञान व अभियांत्रिकीचे पदवीधर पात्र आहेत.भारतामध्ये स्वच्छ पाण्याची उपलब्धता, जलस्त्रोतांची स्वच्छता आणि देखभाल, जलस्त्रोतांचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा परिणामकारक वापर आदी बाबींमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी त्याच्याशी निगडित मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी ज्ञानाची माहिती समाजामध्ये प्रसारीत व्हावी, या उद्देशाने विद्यापीठामध्ये जलसाक्षरतेशी संबंधित नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. त्याआधारे विद्यार्थ्यांना मर्यादीत कालावधीचे अभ्यासक्रम, संशोधनासाठीच्या संधी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तपासणी चाचण्या आदी बाबींचा आढावा घेता येईल. जलसाक्षरतेच्या प्रसारासाठीच्या पर्यावरणपुरक कार्यपध्दती, नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, समाजोपयोगी संशोधने यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी