शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय :जुलै -ऑगस्टमध्ये बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:01 IST

नोकरी करत शिक्षणपूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणी आणि गृहिणींसाठी विद्यापीठाचा बहिस्थ: अभ्यासक्रम उपलब्ध

ठळक मुद्देसर्व तपशील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा जुलै -ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपाची असेल तसेच या  परीक्षेसंदर्भातील सर्व तपशील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील,असे  मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक व विद्यापीठाचे अधिष्ठाता संजीव सोनवणे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

नोकरी करत शिक्षणपूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आणि गृहिणींसाठी विद्यापीठाने बहिस्थ: अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला होता. परंतु, बहिस्थ: अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करून विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षात मुक्त अध्ययन प्रशाळा विभागातर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. पुणे , अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य ,व्यवस्थापनशास्त्र आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.

विद्यापीठातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या अभ्यासकेंद्रांवर या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून त्यांच्या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे निर्माण झालेल्या वातावरणात विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेणे शक्य झाले नाही. तसेच या विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्यही देता आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांनी ज्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेतला आहे त्या अभ्यास केंद्रावर लॉकडाऊन उठल्यानंतर साधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्ययन साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार या विद्यार्थ्यांच्या  २०१९-२० या शैक्षणिक वर्षवर्षाची गणना ऑगस्ट २०१९ ते सप्टेंबर २०२० अशी असणार आहे. तसेच द्वितीय वर्षाचे प्रवेश ऑगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दरम्यान सुरू करण्यात येणार असून त्याबाबतची सूचना विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल , असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी