शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

''या'' तारखेला होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणूका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 15:25 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विद्यापिठाकडून महाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातीलविद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजलं आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दि. ७ सप्टेंबरला मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणुक होणार आहे. दि. २४ सप्टेंबर रोजी मतदान तर दि. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.मागील काही वर्षांपुर्वी बंद करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका यंदा पुन्हा होणार आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी बुधवारी रात्री उशिया या निवडणुकांचे वेळापत्रक प्रसिध्द केले. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्था व विभागांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची अधिसुचना दि. २१ ऑ गस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. २९  ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, ५ सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर दि. ७ सप्टेंबर रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान होईल. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य सलग ४ तासांची मतदानाची वेळ निश्चित करतील. मतदानांतर महाविद्यालयातच मतमोजणी करून लगेच निकाल घोषित केला जाईल.महाविद्यालयांमधील निवडणुका झाल्यानंतर लगेच दि. ९ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणुक अधिसुचना प्रसिध्द केली जाईल. दि. १४ व १५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणे, दि. १९ व २० सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे, दि. २४ सप्टेंबर मतदान तर दि. २७ सप्टेंबरला मतमोजणी व निकाल असा निवडणुक कार्यक्रम असेल. ही मतमोजणी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये होईल. 

  • महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणुक वेळापत्रक

दि. २१ ऑगस्ट - निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द करणेदि. २३  ऑ गस्ट - मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी आरक्षण सोडत आणि तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द करणेदि. २६  ऑगस्ट - मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणेदि. २७  ऑगस्ट - अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणेदि. २९  ऑगस्ट - उमेदवारी अर्ज दाखल करणेदि. ३१  ऑगस्ट - अर्ज छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिध्द करणेदि. ३ सप्टेंबर - अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणेदि. ४ सप्टेंबर - आक्षेपाबाबत सुनावणी घेणे, अपीलानंतर अंतिम अजार्ची यादी प्रसिध्द करणेदि. ५ सप्टेंबर - अर्ज माघारी घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणेदि. ७ सप्टेंबर - मतदान, मतदानानंतर मतमोजणी व निकालदि. ९ ते २१ सप्टेंबर - उमेदवारांच्या खचार्चा हिशेब सादर करणे

 

  • विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुक वेळापत्रक

दि. ९ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द करणे, तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द करणेदि. ११ सप्टेंबर - मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणेदि. १३ सप्टेंबर - आक्षेपांवर निर्णय घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणेदि. १४ व १५ सप्टेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणेदि. १६ सप्टेंबर - अर्जांची छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिध्द करणेदि. १७ सप्टेंबर - अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणेदि. १८ सप्टेंबर - आक्षेपांवर निर्णय घेऊन वैध व अवैध अर्जाची यादी प्रसिध्द करणेदि. १९ व २० सप्टेंबर - अर्ज माघारी घेणेदि. २० सप्टेंबर - पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणेदि. २४ सप्टेंबर - मतदानदि. २७ सप्टेंबर - मतमोजणी व निकालदि. २८ सप्टेंबर - एनएसएस/क्रीडा/एनसीसी/सांस्कृतिक यातील सदस्यांचे नामनिर्देशन करणेदि. ३० सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर - उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब सादर करणे  

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीElectionनिवडणूक