शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : सत्रपूर्तता संपलेल्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 04:48 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमधील ज्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता पूर्ण झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून या शैक्षणिक वर्षामध्ये (२०१८-२०१९) परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे.

पुणे  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमधील ज्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता पूर्ण झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून या शैक्षणिक वर्षामध्ये (२०१८-२०१९) परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. त्यांना येत्या २४ सप्टेंबरपासून परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएसस्सी, बीकॉम, बीसीए, इंजिनिअरींग आदी सर्व विद्याशाखांचे जे विद्यार्थी २००८ पॅटर्नचे आहेत; मात्र अद्याप काही विषय उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांना यंदाच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे यांनी कुलगुरूंनी हा निर्णय बदलावा, यासाठी वारंवार निवेदने दिली होती. या पार्श्वभूमीवर अखेर सत्रपूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी परीक्षा देण्याची एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ही विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी असणार आहे.विद्यार्थ्यांकडून याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. ही शेवटची संधी असून ते पुन्हा पुढच्या वर्षी आणखी मुदतवाढीची मागणी करणार नाहीत, असे त्यांना लिहून द्यावे लागेल.सत्रपूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पहिल्या वर्षीपासून प्रवेश घ्यावा लागणार असल्याने त्यांच्यामध्ये मोठी नाराजीची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा १५ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र