शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ होणार २० जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:50 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ दि. २० जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देविद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित केले जात आहे वर्षातून दोन पदवी प्रदानशाकाहाराची अट रद्द होईपर्यंत शेलारमामा सुवर्णपदक स्थगित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ दि. २० जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या समारंभाची जोरदार तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे. विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना या दिवशी पदवी प्रदान केली जाणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार आता वर्षातून दोन पदवी प्रदान कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यापैकी जानेवारीत होणारा प्रदवी प्रदान समारंभ हा खूप मोठा असतो. एप्रिल-मे दरम्यानच्या नियमित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी दिल्या जातात. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते, त्यामुळे तो पदवी प्रदान सोहळा अगदी छोट्या पातळीवर पार पडतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. त्यामुळे पदवी प्रदान समारंभा दिवशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी उसळत असते. सर्वच विद्यार्थ्यांना विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी घेण्यासाठी न बोलाविता महाविद्यालय स्तरावर पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात येऊ लागल्याने आता ही गर्दी आटोक्यात आली आहे. पदवी मिळाल्यानंतर गाऊन आणि टोपी घालून फोटो काढण्याची मोठी झुंबड कॅम्पसमध्ये उडते. 

शेलारमामा सुवर्णपदक यंदा नाहीचपदवी प्रदान समारंभामध्ये गुणवान विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येते. शाकाहाराची अट घालण्यात आलेले शेलारमामा सुवर्णपदकावरून प्रचंड वादंग झाले होते. त्यानंतर डॉ. नितीन करमळकर यांनी शेलारमामा यांच्या नातेवाइकांशी चर्चा करून शाकाहाराची अट रद्द होईपर्यंत हे सुवर्णपदक स्थगित ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र ती प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने यंदाच्या पदवी प्रदान समारंभात शेलारमामा सुवर्णपदक दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे