शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या प्लॅस्टिकबंदीला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:19 IST

विद्यार्थी, कर्मचारी, उपहारगृह चालकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर

ठळक मुद्देप्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापराव्यात, असे आवाहन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या आवारात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटलीबंद पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली असून त्याबाबत विद्यापीठाकडून परिपत्रकही काढण्यात आले. परंतु, विद्यापीठ आवारातील उपाहारगृहांत सर्रास प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा, पिशव्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने काढलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशाला विद्यापीठातील  कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांकडूनही ठेंगा दाखविण्यात येत असल्याचे दिसून येते.शिक्षण संस्थांमध्ये प्लॅस्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठाच्या आवारात बाटलीबंद पाणी, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्यास बंदी घातली होती. परंतु, विद्यापीठ आवारातील बहुतांश सर्व उपाहारगृहांमध्ये बाटलीबंद पाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच, विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थी अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे विद्यापीठ परिसरात कुठेही प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि पिशव्या टाकल्या जातात. परिणामी, विद्यापीठाचा परिसर अस्वच्छ होतो.प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. तसेच, प्लॅस्टिकऐवजी इतर धातँच्या पाण्याच्या बाटल्या वापराव्यात, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले होते. परंतु, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने काढलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशाला एक प्रकारे केराची टोपली दाखविली असल्याचे दिसून येत आहे.......विद्यापीठ प्रशासनाने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बाटलीबंद पाणी वापरण्यावर प्रतिबंध घातला. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्लॅस्टिकबंदच्या निर्णयाचे उल्लंघन करणाºयावर कारवाई केली जाणार आहे.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठPlastic banप्लॅस्टिक बंदी