शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचा-यांनी वाचवले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 20:04 IST

वानवडी परिसरात बेशुध्द अवस्थेत पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला तात्काळ रुग्णालयात नेवून वानवडी बाजार पोलीस चौकीच्या कर्मचा-यांनी वृद्धाचे प्राण वाचवले.

ठळक मुद्देसंबंधित पोलीस कर्मचा-यांनी केस पेपर काढून त्यांना रुग्णालयात केले दाखल

पुणे : वानवडी परिसरात बेशुध्द अवस्थेत पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला तत्काळ रुग्णालयात नेवून वानवडी बाजार पोलीस चौकीच्या कर्मचा-यांनी वृद्धाचे प्राण वाचवले. इतकेच नव्हे तर नातेवाईकांची माहिती नसल्याने कर्मचा-यांनी स्वत:हून केस पेपर काढुन त्याला रुग्णालयात दाखल केले.    हेमंत हनुमंत तारे (वय ५८,किरण सोसायटी, सहकारनगर) हे बेशुध्दावस्थेत पडलेले होते. तारे व्यक्ती घरातून बेपत्ता झाल्याने त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी ज्ञानदेव गिरमकर व कैलास माळकर यांना पोलीस नियंत्रण कक्षातून डीफेन्स कॉलनी येथील पाण्याच्या टाकी जवळ एक व्यक्ती बेशुध्द अवस्थेत पडलेला आढळल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार देघांनी तेथे धाव घेतली. तेथे त्यांना तारे बेशुध्दावस्थेत पडलेले आढळले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांच जीव वाचविण्यासाठी तात्काळ १०८ नंबरला कॉल करून रुग्णवाहिका मागवली. त्यांना ससून रुग्णलयात दाखल केले असता, नातेवाईक नसल्याने डॉक्टरांनी केसपेपर काढावा लागेल असले सांगितले. यावर संबंधित पोलीस कर्मचा-यांनी केस पेपर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू केल्यावर संबंधित व्यक्ती संदर्भात सहकारनगर येथे मिसिंग दाखल असल्याचे समजले. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. त्यामुळे तारे यांच्या नातेवाईकांनी वानवडी बाजार चौकीत येऊन पोलिसांचे अभार मानले. पोलिसांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन नातेवाईकांनी आनंद साजरा केला. 

टॅग्स :WanvadiवानवडीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल