शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर पैसे माेजा अन् थेट ॲडमिशन मिळवा; विद्यार्थी-पालकांना लाखाे रुपयांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 05:43 IST

मेडिकल, इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेत एजंटांचा सुळसुळाट

पुणे : पाल्याला चांगल्या महाविद्यालयात, आवडीच्या शाखेत प्रवेश मिळावा म्हणून पालक वाटेल ते करायला तयार असतात. याचाच फायदा घेत एजंटगिरी बाेकाळली आहे. ‘मेडिकल, इंजिनीअरिंग किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीट मिळत नाही? आम्हाला फक्त काही हजार ते लाख रुपये द्या आणि तुम्हाला ‘ओळखी’तून सीट मिळवून देताे’ असे सांगत  भुरळ घालत लूट सुरू आहे.  

मेडिकल व इंजिनीअरिंगला जास्त मागणी आहे. पुण्यातील नावाजलेल्या संस्थांमध्ये ॲडमिशन मिळावे, ही पालकांची आणि विद्यार्थ्यांचीही इच्छा असते. ज्यांना मार्क कमी आहेत किंवा जे पुण्याबाहेर राहणारे आहेत आणि प्रवेश घेऊ इच्छितात, अशांना हे एजंट हेरतात आणि संपर्क साधतात.

अशी असते ‘माेडस ऑपरेंडी’   पुण्यात यायचे. एक आलिशान ऑफिस थाटायचे आणि काॅल करण्यासाठी मुलींना ठेवायचे. त्यामधून जे गळाला लागतात त्यांना ऑफिसला किंवा आलिशान हाॅटेलमध्ये बाेलवून मार्केटिंग करून पटवून द्यायचे, अशी यांची माेडस ऑपरेंडी असते. ओळखीतून नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मॅनेजमेंटने ठरवलेल्या एकूण सीटच्या दहा टक्के रक्कम (जी ५० हजार ते २ लाख रुपये असते) भरायला सांगतात. प्रवेश झाला तर ठीक; परंतु प्रवेश न मिळाल्यास घेतलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ करतात. यामध्ये बहुतेक करून बिहार, झारखंडच्या एजंटांचा सुळसुळाट आहे.

असा आला अनुभव... माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी नाेटबुक एज्युकेशन या एजन्सीने पुण्यातील नामांकित काॅलेजमध्ये इलेक्ट्राॅनिक अँड टेलिकम्युनिकेशन विषयाला ॲडमिशन करून देण्यासाठी साडेतीन लाख रुपये मागितले. आधी पन्नास हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर फाेन केल्यास पुन्हा-पुन्हा फाेन करू नका, पैसे परत देताे, असे सांगायचे. २० नाेव्हेंबर ही ॲडमिशनची शेवटची तारीख हाेती. शेवटी ॲडमिशन झालेच नाही. नंतर त्यांनी फाेन उचलणेच बंद केले.  - पृथ्वीराज पाटील, पालक, जळगाव 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"