शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सवाईचा स्वरमंच...उत्साह आणि चैतन्याचा प्रवाह..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 12:36 IST

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या जादुई स्वरमंचावरील सादरीकरण हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.

ठळक मुद्देकलाकारांच्या भावना : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पहिलेवहिले सादरीकरणसरोदवादक बसंत क्राबा, गायिका डॉ. रिता देव, गायक रागी बलवंत सिंग यांचा ‘लोकमत’शी संवाद

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : गायन, वादन, नृत्य यांचा अनोखा मिलाफ असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या जादुई स्वरमंचावरील सादरीकरण हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. दिग्गजांच्या सादरीकरणाने पावन झालेल्या या स्वरमंचावर पहिलेवहिले सादरीकरण उत्साह आणि चैतन्याचा प्रवाह जागवणारे आहे. गुरुंच्या आशीर्वादाने या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असल्याच्या भावना सरोदवादक बसंत क्राबा, बनारस घराण्याच्या गायिका डॉ. रिता देव आणि पंजाबचे गायक रागी बलवंत सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णादेवी यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ६० वर्षीय बसंत काब्रा सरोदवादक करणार आहेत.काब्रा यांचे वडील दामोदरलाल हे उस्ताद अकबर अली खाँ यांचे पहिले शिष्य. मूळचे जोधपूरचे असलेल्या काब्रा यांनी वडिलांकडून सरोदवादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. वयाच्या १८ व्या वर्षी ते गुरुमाँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडे शिकण्यासाठी रवाना झाले. मैहार-सेनिया घराण्याची खासियत त्यांच्या वादनातून झळकते. ते म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आलो होतो. तेव्हाच पुणेकर रसिकांची मिळालेली दाद थक्क करणारी होती. सवाईच्या स्वरमंचावरील सादरीकरण ही आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोच्च पर्वणी आहे. या स्वरमंचाच्या रुपाने दिग्गजांचा आशीर्वाद मिळवण्याचे भाग्य लाभले आहे. सरोदवादनामध्ये सूर-स्वरांच्या तयारीबरोबरच रागाची प्रकृती समजून घेणे आवश्यक असते.’ज्येष्ठ गायिका गिरिजादेवी यांच्या शिष्या डॉ. रिता देव महोत्सवाच्या दुस-या दिवसाची सुरुवात करणार आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील त्यांचे हे पहिलेच सादरीकरण. लहानपणापासून त्यांनी निर्मल आचार्य यांच्याकडे संगीताचा श्रीगणेशा केला. आसाममधून बनारसला आल्यानंतर चित्तरंजन ज्योतिषी यांच्याकडून शिक्षण घेतल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी त्या गिरिजादेवी यांच्याकडे गेल्या. बनारस घराण्यामध्ये शिष्य परिपक्व झाल्याची खात्री पटल्यावर बुजूर्गांसमोर मंचप्रदर्शन करुन परीक्षा घेतली जाते आणि शिष्याच्या हातात ‘गंडा’ बांधला जातो. गिरिजादेवींनी स्वत: रिता देव यांच्या हातावर ‘गंडा’ बांधला आहे. त्या म्हणाल्या, ‘बनारस घराण्याचे गायन चौमुखी आहे. ख्याल, धृपद, खमाज, ठुमरी, दादरा, होरी असे वैविध्य घराण्यात पहायला मिळते. मी सवाईमध्ये गिरिजादेवी यांचे स्मरण करुन ख्यालपासून सुरुवात करेन. वेळ असल्यास ठुमरी किंवा दादरा पेश करणार आहे.’रागी बलवंत सिंग तिस-या दिवशी तलवंडी घराण्याची खासियत गायनातून उलगडणार आहेत. ते म्हणाले, ‘मी याआधी अनेकदा पुण्यात येऊन गेलो आहे. मात्र, सवाईच्या स्वरमंचावर पहिल्यांदाच विराजमान होणार आहे. सदगुरु जगजित सिंग यांच्याकडून मला तलवंडी घराण्याची गायकी शिकायला मिळाली. तबला, पखवाजच्या साथीने पंजाबी संगीताची गोडी उलगडत जाते. तलवंडी घराण्याची धृपद गायकी लोकप्रिय आहे. हीच गोडी गायनातून रसिकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न करेन.’ 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतmusicसंगीतartकला