शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ससून रुग्णालयाने वर्षभरात ओलांडला बाह्यरुग्णांचा ७ लाखांचा टप्पा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:47 IST

सोयी-सुविधांमध्ये झालेली वाढ, विविध सेवांचा वाढलेला दर्जा, विश्वासार्हता यांमुळे मध्यवर्गीयही ससूनकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देगरजु-गरीब रुग्णांबरोबरच मध्यमवर्गीयांकडूनही ससूनला पसंती दररोज दिडशेहून अधिक शस्त्रक्रिया

पुणे : ससून रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा सातत्याने वाढत असून मागील वर्षी बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या संख्येने ७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच आंतररुग्ण विभागातील रुग्ण आणि शस्त्रक्रियांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. गरजु-गरीब रुग्णांबरोबरच मध्यमवर्गीयांकडूनही ससूनला पसंती मिळू लागली आहे.ससून रुग्णालयामध्ये मागील काही वर्षांत आमुलाग्र बदल झाले आहेत. पुर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्ण अधिक प्रमाणात उपचारासाठी येत होते. मात्र, आता सोयी-सुविधांमध्ये झालेली वाढ, विविध सेवांचा वाढलेला दर्जा, विश्वासार्हता यांमुळे मध्यवर्गीयही ससूनकडे आकर्षित होऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या विविध भागातून ससून रुग्णालयामध्ये रुग्ण येवू लागले आहेत. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात २०१५ मध्ये सुमारे ६ लाख ४१ हजार रुग्ण आले होते. हा आकडा २०१७ मध्ये सात लाखांच्या पुढे गेला असून वर्षभरात सुमारे ७ लाख ८ हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. रुग्णालयामध्ये एकुण १४९६ खाटांची क्षमता आहे. मागील वर्षभरात आंतररुग्ण विभागामध्ये सुमारे ७८ हजार रुग्णांनी उपचार घेतले. २०१५ मध्ये ही संख्या ६२ हजार ९३२ एवढी होती. रुग्णालयात होणाºया विविध शस्त्रक्रियांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१७ मध्ये सुमारे ५७ हजार रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार दररोज दिडशेहून अधिक शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये लहान-मोठ्या शस्त्रक्रियांसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. २०१५ मधील शस्त्रक्रियांची संख्या केवळ १९ हजार ६५१ एवढी होती. रुग्णालयातील प्रयोगशाळांमध्ये वर्षभरात तब्बल ११ लाख ४० हजार रक्त तपासण्या करण्यात दोन वर्षांच्या तुलनेत ही संख्या खुप वाढली आहे. रुग्णालयामध्ये वाढणाºया रुग्णसंख्येबरोबरच सोयी-सुविधा वाढविण्याचा प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. खासगी कंपन्या, सामाजिक संस्थांकडूनही त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे रुग्णालयातील विविध सेवांचा दर्जा उंचावू लागला आहे.—————-——————-

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलdocterडॉक्टर