सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्री 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना

By श्रीकिशन काळे | Published: September 19, 2023 12:55 PM2023-09-19T12:55:33+5:302023-09-19T12:57:14+5:30

साडेअकरा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

Sarsangchalak Dr. Installation of Shri 'Dagadusheth' Ganpati by Mohan Bhagwat | सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्री 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्री 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना

googlenewsNext

पुणे : मंगलमूर्ती मोरयाचा आणि ढोल ताशाच्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक मोठ्या थाटात सकाळी निघाली. बाप्पासाठी खास हनुमान रथाची सजावट करण्यात आली होती. रथातून मिरवणूक मंडपात आली आणि साडेअकरा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आज सकाळी साडेदहा वाजता हनुमान रथामध्ये ढोलताशाच्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुरू झाली. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता होणार आहे. 
 
प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर श्री हनुमानाच्या ४ मूर्ती विराजमान झालेल्या होत्या. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आली. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

मंदिरापासून निघालेली मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड यांसह गंधाक्ष ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली झाली.

डॉ.मोहन भागवत म्हणाले, जगामध्ये शांती, सुबत्ता, परस्पर सौमनस्य नांदो. तसेच भारत हा सुख शांतीचा मार्ग दाखविणारा देश होवो. रोग मुक्त भारत होवो आणि हे सर्व संकल्प पुण्यापासून सर्व विश्वापर्यंत व्यापक होवो, अशी प्रार्थना गणराया चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sarsangchalak Dr. Installation of Shri 'Dagadusheth' Ganpati by Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.