शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीसाठी संतांचे विचार महत्वाचे : प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:04 IST

सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. त्यातील ५० टक्के रक्कम व्यसनांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा काय उपयोग ? : प्रतिभाताई पाटील

ठळक मुद्देसुमंतजी महाराज नलावडे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा

पुणे : सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. त्यातील ५० टक्के रक्कम व्यसनांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा उपयोग नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी संतांचे विचार महत्वाचे आहेत. संतांचे हे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. देशातील गरिबी हटवण्यासाठी, देश व्यसनमुक्त करण्यासाठी संतांचे विचार महत्वाचे आहे, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. संत तुकाराम महाराज सेवा प्रतिष्ठान व सुमंतजी महाराज नलावडे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा समिती यांच्या वतीने वारकरी संप्रदायातील अध्वर्यु व्यक्तिमत्व, ज्येष्ठ कीर्तनकार भागवताचार्य गुरुवर्य सुमंतजीमहाराज नलावडे (ओतुरकर) यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आणि मीराबाई सुमंतमहाराज नलावडे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी मारुती महाराज कु-हेकर, स्वागताध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, बालयोगी सदानंद महाराज, माजी आमदार उल्हास पवार, शरद सोनावणे, सत्यशील शेरकर, शरद लेंडे, अतुल बेनके, उर्मिला विश्वनाथ कराड, चंद्रकांत महाराज वांजळे, संभाजी खोमणे, महेश महाराज नलावडे, प्रा.सागर शेडगे, अनंत सुतार उपस्थित होते.  प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात मंत्री म्हणून कार्यरत असताना सन १९७४ ते १९७५ च्या सुमारास भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळेला सरकारने दुष्काळासाठी योजना राबविली होती. शेतात काम करणा-या मजुराला रोजच्या कमाईपेक्षा जास्त पैसे मिळत होते. परंतु त्यातील ५० टक्के लोक ते पैसे व्यसनांसाठी खर्च करीत असल्याचे निदर्शनास आले. गरिबी हटवण्यासाठी सरकारी योजनेचा काहीच उपयोग होत नव्हता.’     मारुती महाराज कु-हेकर म्हणाले, ‘भारत ही संतांची भूमी आहे. संतांनी दिलेली अध्यात्माची देणगी पुढे नेण्याचे काम सुमंत महाराज करत आहेत. संतांचा हा वारसा चालवणा-या लोकांची समाजाला गरज आहे.   चंद्रकांत वांजळे यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र नलावडे यांनी आभार मानले.  

टॅग्स :PuneपुणेPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना