शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

माऊली खंडोबारायाच्या भेटीला जेजुरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 9:19 PM

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत मल्हारनगरीत माऊली खंडोबारायाच्या भेटीला जेजुरीत विसावलीे.

पुणे : वारी वो वारी ! देई कां गा मल्हारी ! त्रिपुरारी हरी! तुझे वारीचा मी भिकारी!!भागवत संप्रदायाची भगवी पताका फडकत, तुळशी वृंदावनाच्या डौलात, ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत मल्हारनगरीत माऊली खंडोबारायाच्या भेटीला जेजुरीत विसावलीे. 

सासवडला दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी सकाळी आठ वाजुन पंधरा मिनिटांनी पालखी जेजुरी गडाकडे निघाली. दरम्यान सोपानदेव महाराजांची पालखीने सकाळी अकरा वाजता पिंपळे मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी टाळ मृदुगांच्या गजराने अवघा परिसर नाहून निघाला होता. बोरावळेमळा येथे पालखी पहिल्या विसाव्याला थांबली. त्यानंतर पालखी मार्गस्थ होऊन दुपारी यमाई शिवरी येथे तर दुसऱ्या विसाव्यासाठी आणि नैवेद्यासाठी थांबली होती. साकुर्डे येथे तिसरा विसावा घेऊन साडे पाच वाजता खंडेरायाच्या जेजुरीत आगमन झाले. यावेळी भंडारा उधळून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीचा मुक्काम लोणारी समाज संस्थेच्या मैदानावर असणार आहे. 

सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र हवेत गारवा होता. त्यामुळे गरमी वाटत नव्हती. वारीत चालणारे वारकरी घामाघूम होत असले तरी, चेहऱ्यावर कुठेही थकवा जाणवत नव्हता. तालासुरात वाजणाऱ्या मृदुगांच्या संगीतावर वारकरी मोठ्या उत्साहाने  भजन म्हणत नाचत होते. अधनमधून पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी त्यांचा उत्साह वाढवत होत्या. हलगीचा ताल त्यांच्या उत्साहात भर घालत होता. दुपारी दोनच्या सुमारास पावसाने चांगलाच जोर धरला होता. रस्त्याच्या कडेला मोफत अन्नदान करणारे, पाणी वाटप करणारे स्टॉल उभारले होते. जेजुरी दिसताच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत होता. अनेक वारकऱ्यांनी खंडेराच्या दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती.  जेजुरीत मुक्काम असल्याने राहुट्या उभारल्या होत्या. येथे उत्तम नियोजन दिसुन येत होते. काही ठिकणी कीर्तन, भारुडे, गवळण सुरू होती. जिजाऊ माता शाळेचे आरएसपीचे मुलं मुली वाहतूक नियमनासाठी मदत करत होते. 

परिसर भंडाराने सुवर्णमय झाला मल्हारीस हळद अवडते,  म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने खोबरे भंडाऱ्याची उधळन करत असतो. म्हणून जेजुरीत पालखी येताच भंडारा उधळण्यात येतो. परिसर भंडाराने सुवर्णमय झाला होता. खंडोबा हे शोर्याची स्पुर्ती देणारी देवता म्हणून ओळखला जातो. सोमवारी (आज)  माऊलींची पालखी सकाळी वाल्हे येथे मुक्कामासाठी निघणार आहे.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPuneपुणेJejuriजेजुरी