शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

संक्रातीचा आनंद झाला गोड; पुणे पोलिसांनी परत केला १ कोटी रुपयांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 19:20 IST

पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला़ आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रातीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देचोरीला गेलेले दागिने परत मिळत असल्याचे पाहून अनेक महिलांना आपले अश्रु आवरणे अशक्यया कार्यक्रमात ४२ लाख रुपयांचा ऐवज गौरव चोरडियांना मिळाला परत

पुणे : चोरट्यांनी लुटून नेलेले महिलांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान दागिना असलेले सौभाग्यचे लेणं आता परत मिळल्यांची आशा वाटत नसतानाच पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला़ आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रातीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली़ पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेले हिरे, सोने, चांदीचे दागिने पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले असून ते ७३ फिर्यादींना पुन: प्रदान करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता़ यावेळी आपले चोरीला गेलेले दागिने परत मिळत असल्याचे पाहून अनेक महिलांना आपले अश्रु आवरणे शक्य झाले नाही़ काहींनी पोलिसांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला़ शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ७३ गुन्ह्यातील ३ किलो ५६२़६६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७२६ ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ कोटी १  लाख ८ हजार ३०३ रुपयांचा ऐवज परत करण्यात आला़ यापूर्वीही गेल्यावर्षी २०१७ मध्ये ४ कार्यक्रमातून २ कोटी ३ लाख रुपयांचा ऐवज फिर्यादींना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते परत करण्यात आला होता़ यावेळी सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगांवकर, प्रदीप देशपांडे उपस्थित होते़ या कार्यक्रमात ४२ लाख रुपयांचा ऐवज गौरव चोरडियांना परत मिळाला़ गौरव चोरडिया (मार्केटयार्ड) म्हणाले, गेल्या वर्षी दसºया दिवशी आमच्या घरात घरफोडी झाली होती़ हे समजल्यानंतर १० मिनिटात पोलीस आले़ या दागिन्यांमध्ये आपल्या आईच्या, आजीच्या आठवणी दडलेल्या होत्या़ तेच दागिने चोरीला गेल्याने त्यांना सर्वस्व गेल्याचे दु:ख होत होते़ पुढच्या दोनच दिवसात पोलिसांनी चोरट्यांना पकडले़ त्यांच्याकडून सर्वच्या सर्व दागिने हस्तगत केले़ ते जसेच्या तसे परत मिळत असल्याचे पाहून खूप आनंद झाला़ नमिता गायकवाड (सनसिटी, सिंहगड रोड) : पायी जात असताना चोरट्यांनी माझ्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते़ ते परत मिळण्याची आशा सोडून दिली होती़ पण सोन्यासारखे काम करणारी माणसं असल्याने आज आम्हाला हे सोने परत मिळाले आहे़ वर्षा टाकळकर (पिंपरी) : गणेशोत्सवात कॅरी बॅगला कट मारुन चोरट्याने दागिने चोरुन नेले होते़ परत मिळतील, अशी अपेक्षा नव्हती़ पण, पोलीस विश्वास देत होतो आणि तो खराही ठरला आहे़ 

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या, चोरीला गेलेला ऐवज त्यांना परत मिळावा, असा आमचा प्रयत्न असतो़ आज येथे पोलिसांचे कौतुक होत आहे़ ही सर्व पोलिसांची कामगिरी आहे़ पोलिसांवर विश्वास ठेवा़ वाहतूकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा़ आपल्याजवळ चौकात, उन्हातान्हात पोलीस उभा असले तर त्याची विचारपूस करा़ पुणेकरांचे सहकार्य मिळाले तर, देशात पुणे पोलीस एक नंबरवर येणार आहे़प्रारंभी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले़ विवेक देव यांनी सुत्रसंचालन केले़ तर पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आभार मानले़ 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPuneपुणे