शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संजीव पुनाळेकरांची अटक हा हिंदूंवर दमनशक्तीचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 16:20 IST

काश्मिरी हिंदुचा आवाज दाबण्याकरिता काश्मिरी हिंदुंच्या नेत्यांना मारण्यात आले. त्याप्रमाणे हिंदुंचा आवाज बुलंद करणाऱ्या वकिल संजीव पुनाळेकर यांना अटक करुन दमनशक्तीचा प्रयोग केला जात आहे. त्यामुळे पुनाळेकरांची सुटका होईपर्यंत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना तसेच अधिवक्ता यांचे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेने दिला.

पुणे : काश्मिरी हिंदुचा आवाज दाबण्याकरिता काश्मिरी हिंदुंच्या नेत्यांना मारण्यात आले. त्याप्रमाणे हिंदुंचा आवाज बुलंद करणाऱ्या वकिल संजीव पुनाळेकर यांना अटक करुन दमनशक्तीचा प्रयोग केला जात आहे. त्यामुळे पुनाळेकरांची सुटका होईपर्यंत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना तसेच अधिवक्ता यांचे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेने दिला. गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी ही माहिती दिली.  डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्याकडे चौकशी केली असता त्यातून अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यातून सीबीआयने सनातनचे वकिल संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली. ही अटक करुन एका खोट्या आरोपाखाली सीबीआयने सूड उगवला असलयचे संघटनेने म्हटले आहे. तसेच या अटकेमुळे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते यांच्यात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना निवेदने, तक्रारी करुन, निदर्शने करुन या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. जोपर्यंत सीबीआय पुनाळेकर यांच्यावरील खोटे आरोप मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करीत नाही तोपर्यंत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलन सुरु ठेवण्यात येणार आहे. पोलीस कोठडीत एका आरोपीला जबर मारहाण करुन घेतलेल्या जबाबावरुन पुनाळेकर यांना लोकसभेच्या निवडणूका झाल्यानंतर अटक करणे हे मोठे षडयंत्र आहे. यासर्वाचा निषेध म्हणून थेट सीबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याचे घनवट यांनी सांगितले. यावेळी पनुन काश्मिरचे रोहीत भट, अखिल राजस्थान समाज संघाचे जयसिंग राजपुरोहित, सावरकर युवा विचार मंचचे डॉ.निलेश लोणकर, पराग गोखले उपस्थित होते. 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखूनCourtन्यायालय