मंचर: येथील महात्मा गांधी रयत इंग्लिश मेडीयम स्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून ऍटोमॅटिक सॅनिटायजर मशीन भेट देण्यात आले. याप्रसंगी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. कानडे, रयत इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सलमा शेख, स्कूल कमिटी मेंबर डॉ. चैत्राली मोरे व शिल्पा खुडे तसेच एचएससी ८८ फाऊंडेशनचे सचीव महेश मोरे व सहसचिव बासिदखान पठाण उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेल्या शाळा सुरू करण्यास सर्व कोवीड प्रतिबंध नियमास अनुसरून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शाळेसाठी अत्यंत गरजेचे असलेले ऍटोमॅटिक सॅनिटायजर मशीन चैत्राली मोरे यांचे मार्फत देण्यात आले. महेश मोरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय मंचर येथे १९८८ च्या एच.एस.सी बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या फाऊंडेशनच्या कामकाजाची माहिती दिली. याद्वारे येत्या काळात अनेक प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय ई क्षेत्रात काम करणार असल्याची माहिती दिली. या संस्थेचे अध्यक्ष मंगेश शिंदे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खिलारी हे आहेत. तसेच संस्थेचे सहसचिव बासिदखान पठाण यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्राचार्य के.जी.कानडे यांनी मनोगत व्यक्त केले व या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापिका सलमा शेख यांनी आभार व्यक्त केले.
रयत इंग्लीश स्कूलला सॅनिटायझर मशीन भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST