शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

भीमाशंकरच्या रस्त्यासाठी २ कोटी निधी मंजूर, महिनाभरात होणार कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:57 IST

भीमाशंकर येथील देवस्थान परिसरात पावसाळ्यात वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे मंदिरापासून एक किमी लांबीचा सिमेंटचा रस्ता केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रश्नासनाकडून २ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील महिनाभरात निविदा काढून रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.

पुणे : भीमाशंकर येथील देवस्थान परिसरात पावसाळ्यात वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे मंदिरापासून एक किमी लांबीचा सिमेंटचा रस्ता केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रश्नासनाकडून २ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील महिनाभरात निविदा काढून रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.पुण्यात आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भीमाशंकर देवस्थानच्या विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत चर्चा झाली होती. शासनाकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिली होते. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाच्या अधिकाºयांनी रस्त्याचे काम तातडीने करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या कामासाठी चार दिवसांपूर्वी निधी उपलब्ध करून दिला आहे.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान असल्याने महाराष्ट्रासह देशभरातील भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. मात्र, अरुंद व खराब रस्त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.त्यातही पावसाळ्यात रस्ता वाहून गेल्याने आणि चिखल साचल्याने वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे या परिसरात सिमेंटचा पक्का रस्ता तयार करावा, अशी मागणी केली जात होती.दरवर्षी हजारो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. पावसाळ्यात रस्ता वाहून गेल्याने मंदिराजवळ वाहनांना जाता येत नाही. काही वेळा वाहने चिखलात रुतून बसतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व व्हीआयपी व्यक्तींना मंदिरापर्यंत वाहनांमधून जाता येत नाही. परंतु, मंदिरापासून एक किमी लांबीचा आणि ५.५ रुंदीचा सिमेंटचा रस्ता तयार केला जाणार आहे. तसेच एक छोटा पूल व ५ ते ६ सीसीडी वर्क आदी कामे केली जातील.- राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Bhimashankarभीमाशंकर